गलगले (ता. कागल) येथील निवळे वसाहतीमध्ये आयोजित उदरनिर्वाह भत्ता धनादेश व रेशनकार्ड वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वारणा धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्त संग्राम संघटनेचे मार्गदर्शक गौरव नायकवडी होते. यावेळी ६९ अभयारण्यग्रस्तांना ३९ लाख रुपयांचे व दहाजणांना रेशनकार्डचे वाटप केले.
चांदोली अभयारण्यग्रस्तांना जमीन देण्याबाबत प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, वन विभागाच्या नागपूर कार्यालयाची मंजुरी मिळताच दिवाळीपूर्वी जमिनीचे वाटप केले जाईल.
गौरव नायकवडी म्हणाले, विस्थापितांनी एकजुटीने आपल्या न्याय-हक्कांसाठी पुढे यावे. मंत्री मुश्रीफ यांनी विस्थापितांच्या प्रश्नांमध्ये लक्ष घातल्याने त्यांना न्याय मिळणार, याची आम्हाला खात्री आहे.
प्रास्ताविक भरत मुळीक यांनी केले. यावेळी सहायक वनसंरक्षक सुनील निकम, मारुती पाटील, सीताराम बडदे, बंडू मुळीक, शामराव पाटील, दगडू पाटील, लक्ष्मण चव्हाण, लक्ष्मण मुळीक, लक्ष्मण पाटील, विलास मुळीक, संजय मुळीक, चंद्रकांत चव्हाण, लक्ष्मी मुळीक, सविता पाटील उपस्थित होते.
कँप्शन - गलगले येथील निवळे वसाहतीतील विस्थापित ग्रामस्थांना उदरनिर्वाह भत्ता व रेशन कार्डचे वाटप करताना मंत्री हसन मुश्रीफ, गौरव नायकवडी.
छाया-संदीप तारळे, गलगले