कोल्हापूर - गेले शंभर आठवडे अव्याहतपणे सुरु असलेले रविवारचे महास्वच्छता अभियान यापुढेही सुरु ठेवण्याचा संकल्प प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी केला तर अभियानात यापुढे पोलीस दलही सहभागी होईल, असे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी जाहीर केले. त्यामुळे पुढील काळात महापालिकेसह पोलीस खातेही शहर स्वच्छतेच्या अभियानात भागीदारी करेल.
दसरा चौक येथील संप आणि पंप हाऊस येथे रविवारी सकाळी अभियानाचा प्रारंभ झाला. अभियानात पुणे भूजल सर्वेक्षण विभागाचे संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, प्रशासक कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त रविकांत आडसूळ, निखिल मोरे, शिल्पा दरेकर, सहायक आयुक्त चेतन कोंडे, संदीप घार्गे, आरोग्याधिकारी डॉ. अशोक पोळ, जल अभियंता नारायण भोसले, क्रिडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, विकी महाडिक, स्वच्छतादूत अमित देशपांडे, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार उपस्थित राहून भागिदारी केली. यावेळी याठिकाणी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. प्रशासक बलकवडे यांनी अभियानाचे प्रेरणास्त्रोत मल्लिनाथ कलशेट्टी यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार केला.
अभियानात रंकाळा टॉवर, तांबट कमान, इराणी खण, यल्लाम्मा मंदिर, महालक्ष्मी मंदिर, शाहू समाधी परिसर, पंचगंगा घाट परिसर, शिवाजी विद्यापीठ मेनरोड, कोटीतीर्थ तलाव, रेल्वे स्टेशन समोरील संपूर्ण परिसर, राजाराम बंधारा, तावडे हॉटेल ते मार्केट यार्ड मेनरोड परिसर येथे स्वच्छता करण्यात आली. सर्व हेरिटेज वास्तू महापालिकेची कार्यालयांचीही स्वच्छता करण्यात आली. दिवसभरात पाच टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले.
स्वरा फाउंडेशनतर्फे जयंती पंपिंग स्टेशन येथे वृक्षारोपण करण्यात आले. दसरा चौक येथे पंचगंगा नदी घाटाची स्वच्छता केली. क्रेडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, आर्किटेक अजय कोराणे, विकी महाडिक, प्राजक्ता माजगावकर, सविता पाडलकर, अमृता वास्कर, पीयूष हुलस्वार, फैजाण देसाई, डॉ अविनाश शिंदे उपस्थित होते.
वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशनतर्फे ऐतिहासिक दसरा चौकाची स्वच्छता करण्यात आली. अमोल बुड्ढे, सतीश कोरडे, विकास कोंडेकर, अक्षय कांबळे, सविता साळोखे, विद्या पाथरे, अमृता वासुदेवन, सागर वासुदेवन, भालचंद्र गोखले, साजिद शेख, अनुज वाघरे यांनी यात भाग घेतला.
राजाराम बंधारा येथे झालेल्या स्वच्छता मोहिमेत दत्तात्रय चौगुले, नंदकिशोर, अजित पाटील यांनी भाग घेतला. ताराबाई उद्यान येथे न्यू शाहूपुरी व ताराबाई पार्क येथील नागरिक व महापालिका कर्मचारी यांच्या वतीने महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी दीपाली घाटगे, राजेश घाटगे, संजय घाटगे, विलास भोसले, सुरेश शहा, अलनसीर जहागीरदार, रवी रायबागकर, मनोहर माने उपस्थित होते.
( फोटो देत आहे. )