लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोनामुळे गेल्या वर्षभरात बरेच वाईट प्रसंग घडले असले तरीही जिल्ह्याचा गुन्हेगारीचा आलेख हा २०१९ च्या तुलनेत बराच अंशी घसरला असल्याची समाधानाची गोष्ट आहे. भारतीय दंड संहितेंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हे दोष सिद्ध झाले आहेत. जिल्ह्यात वर्षभरात सुमारे १९४ गुन्ह्यांची घट झाली. राज्यासोबतच कोल्हापूर जिल्ह्यातीलही गुन्हेगारी कमी झाल्याचे पोलिसांकडील आकडेवारीवरून सिद्ध होत आहे. गुन्हेगारीची तुलना करता २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये १४ टक्क्यांनी गुन्हेगारी घसरल्याचे दिसून येत आहे.
कोल्हापूर जिल्ह्याचा गुन्हेगारीचा आढावा घेता दरवर्षी गुन्हेगारी प्रमाणात कमालीची वाढ असते; पण गेल्या वर्षी कोरोनामुळे एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत नागरिकांवर प्रशासनाने बंधणे आणल्याने नागरिकांना रस्त्यावरून फिरणे मुश्कील बनले होते. परिणामी, घरातूनच बाहेर कोणी पडले नसल्याने घराबाहेरील गुन्ह्यांच्या प्रमाणात घट झाली; पण गृहकलहाच्या गुन्ह्यांत कमालीची वाढ झाल्याचे दिसून आले. त्याचबरोबर गुन्हे सिद्ध होण्याचा दर हा गतवर्षी १६ टक्क्यांनी वाढला. कोल्हापूर जिल्हा तसा सधन आहे, तरीही गत वर्षी मार्चनंतर कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन झाले अन् गुन्हेगारी घटली आहे. ही गुन्हेगारी घटली असली तरी जुगार, दारूबंदी व वाहनांवरील कारवाईच्या गुन्ह्यात कमालीची वाढ झाली. जिल्ह्यात ३१ पोलीस चौक्या व ३० मुख्य पोलीस ठाणे आहेत. यापैकी चंदगड, हातकणंगले पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण मोठे आहे.
गृहमंत्री म्हणतात, राज्याचा क्राइम रेट घटला
१३ टक्क्यांनी वाढला गुन्हे सिद्ध होण्याचा दर, ३,२०० ने घट झाली. पोक्सोंतर्गत गुन्ह्यात, ११ टक्क्यांनी घट झाली. बलात्काराच्या गुन्ह्यात, ९५९ ने घट झाल्याचे महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात.
जिल्ह्यात सर्वाधिक गुन्हे पोक्सोंतर्गत
जिल्ह्यात पोक्सोंतर्गत दाखल झालेल्या बलात्काराचे गुन्हे अधिक आहेत. या घटनेत अल्पवयीनच बळी ठरत असल्याचे या आकडेवाडीवरून दिसत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात काय?
गुन्हे... - २०१९ - २०२०
गुन्हे सिद्ध होण्याचा दर- ४६ टक्के - ६२ टक्के
पोक्सोंतर्गत गुन्हे - ७९ - ६४
बलात्कार गुन्हे - १२६ - ११५
महिला अत्याचार - ९४५ - ९५५
पॉइंटर...
- १६ टक्क्यांनी वाढला गुन्हे सिद्ध होण्याचा दर
- १५ पोक्सोंतर्गत गुन्हे घटले
- १० महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात वाढ
- १३ बलात्काराचे गुन्हे घटले