शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

शाहूवाडी तालुक्यात मूलभूत सुविधांचीही वानवा

By admin | Published: November 06, 2014 8:54 PM

विकासाच्यादृष्टीने मागासच : मोठे प्रकल्प नाहीत; विशाळगड, पावनखिंडीचा विकास अडकला ‘लालफितीत’--शाहूवाडी तालुका

राजाराम कांबळे - मलकापूर -देशाला स्वातंत्र्य मिळून पासष्ट वर्षे झाली तरी शाहूवाडी तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला अजून चालना मिळालेली नाही. विकासापासून वंचित असणारा तालुका म्हणून शाहूवाडी तालुक्याची ओळख आहे. शाहूवाडी तालुका नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असला, तरी अद्याप सर्वांगीण विकासाच्यादृष्टीने फारच मागास आहे.तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ मोठे आहे. येथे शंभर टक्के शेती केली जाते. मुख्य पीक भात व ऊस आहे. तालुक्यात प्रलंबित प्रकल्पांची उभारणी झालेली नाही. त्यामुळे बेरोजगारीची समस्या मोठी आहे. शेती व पिण्याचा पाण्याचा प्रश्न मोठा असून, रस्त्यांची समस्या, दळण-वळणाचा अभाव, पर्यटनदृष्ट्या विकास, व्याघ्र प्रकल्प, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेपण, शासकीय योजना तळागाळापर्यंत न पोहोचणे, अशी आव्हानांची मालिकाच आहे.येथे बॉक्साईटची नैसर्गिक संपत्ती विपुल प्रमाणात आहे. हजारो टन बॉक्साईट परदेशात व परराज्यांत पाठविले जाते. बॉक्साईट खाणींवर परप्रांतीयांची मालकी आहे. स्थानिक नागरिकांना रोजगार करू दिला जात नाही. बॉक्साईटच्या माध्यमातून तालुक्याला फायदा झालेला नाही. शासनाला लाखो रुपयांची रॉयल्टी मिळते; पण रॉयल्टीमधून प्रतिवर्षी विकासकामे होत नाहीत. खासगी तत्त्वावर वालूर येथे उभा राहिलेला मिनी बॉक्साईट प्रकल्प आर्थिक अरिष्टात सापडला आहे, तर कडवे येथे उभा राहिलेला बॉक्साईट प्रकल्प बंद आहे.पंधरा वर्षांपूर्वी मंजूर असलेल्या एम.आय.डी.सी.चा प्रश्न ‘जैसे थे’ आहे. ही एम.आय.डी.सी. वारूळ की भैरेवाडी या दोन्ही ठिकाणांपैकी कोठे उभी करावयाची या प्रश्नाभोवती चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. बांबवडे येथे माजी खासदार उदयसिंगराव गायकवाड यांनी सहकारी तत्त्वावर उदय साखर हा कारखाना चालू केला. एक वर्ष साखर कारखाना व्यवस्थित चालू होता; मात्र हा कारखानादेखील आर्थिक अरिष्टात सापडला आहे. माजी आमदार बाबासाहेब पाटील यांनी तालुक्यात सूतगिरणीसाठी मोठे प्रयत्न केले होते. मात्र, ही सूतगिरणी कागदावरच आहे. संयुक्त गायकवाड गटाने तालुका दूध संघाच्या निर्मितीसाठी मोठे प्रयत्न केले. मात्र, अद्यापही दूध संघाचे पायापूजन झालेले नाही. वारणा, कडवी व कासारी या धरणांमुळे काही भाग पाण्याखाली आला आहे. मात्र, त्याचा वापर व्यवस्थित होत नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी कोरडवाहू शेती दिसते. अडविलेल्या पाण्याचा शेतीसाठी वापर व्हावा यासाठी नियोजन होणे आवश्यक आहे. तालुक्यातून वारणा उजवा कालवा गेला आहे. मात्र, येथील शेतकऱ्यांना वरदान ठरण्याऐवजी तो मृत्यूचा सापळा ठरला आहे. तालुक्यात उच्च व व्यावसायिक शिक्षणाची वानवा आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयाची सोय होण्याची गरज आहे. तालुक्यात सहकारी तत्त्वावर दुग्ध प्रकल्प होणे गरजेचे आहे. विनय कोरे यांनी वारूळ येथे दूध प्रकल्पाची घोषणा केली होती. बॉक्साईटपासून तुरटी बनविण्याचा कारखाना सुरू करण्यात येणार होता. मात्र, या घोषणा हवेतच विरल्या आहेत. समाजकल्याण खात्याकडून हारूगडेवाडी व उचत येथे घायपात प्रकल्पासाठी शासनाने कर्ज पुरवठा केला आहे. मात्र, पाच ते सात वर्षे झाली या जागेवर बांधकामाअभावी काहीच प्रगती झालेली नाही. शैक्षणिक मागण्याक्रीडा संकुलाची उभारणीउच्च अभियांत्रिकी महाविद्यालय शासकीय इंग्रजी शाळाविभागाच्या मागण्याशाहूवाडी पोलीस ठाणे इमारतवाहतूक पोलीस शाखाशासकीय कर्मचारी निवासस्थानमलकापूर शहराचे प्रश्नमलकापूर शहराची हद्दवाढसुधारित विकास आराखड्याची गरजसांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पपर्यटनातून रोजगार निर्मितीविशाळगड-आंबा परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकासपावनखिंडीचा विकासकिल्ले विशाळगडाची डागडुजी, मंदिरांचा जीर्णोद्धार४तालुक्यातील श्री जुगाईदेवी, श्री धोपेश्वर, श्री काळाम्मादेवी, उदगिरी येथील मंदिरांचा व परिसराचा विकास होणे गरजेचे ४फळ प्रक्रिया उद्योग सुरू करण्याची मागणीआंबा-विशाळगड परिसर हा निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेला पर्यटनाचा अमूल्य ठेवा आहे. या विभागाचा पर्यटनदृष्ट्या विकास होणे आवश्यक आहे. किल्ले विशाळगड व पावनखिंडीचा विकास झाल्यास शिवकालीन ऐतिहासिक इतिहास जपला जाईल. किल्ले विशाळगड विकास आराखडा शासन दरबारी धूळ खात पडला आहे.तालुक्यातील वाड्या-वस्त्यांवरचे पिण्याच्या पाण्याचे व रस्त्यांचे प्रश्न मार्गी लागावयास हवेत. धनगरवाडे आजदेखील मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. तालुक्याच्या निम्म्या वाड्या-वस्त्यांवर रस्ता व दळणवळणाची सुविधा उपलब्ध नाही. पावसाळ्यात विद्यार्थी-नागरिकांना जीव मुठीत घेऊन पाण्यातून प्रवास करावा लागतो. कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झालेली आहे. डोंगरी तालुक्यात नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बांबवडे येथे ग्रामीण रुग्णालय होणे गरजेचे आहे, तर मलकापूर नगरपरिषदेची हद्दवाढ होणे गरजेचे आहे.तालुक्यात मोठ्या औद्योगिक प्रकल्पाची उभारणी होणे आवश्यकतालुक्यात रताळी हे पीक मोठे आहे. यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभा करणे आवश्यक आहे. करवंद, जांभूळ विपुल प्रमाणात आढळतात. मात्र, प्रक्रियाअभावी ती परजिल्ह्यांत पाठविली जातात. आंबा-विशाळगड परिसर हा निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेला पर्यटनाचा अमूल्य ठेवा आहे. या विभागाचा पर्यटनदृष्ट्या विकास होणे आवश्यक आहे. किल्ले विशाळगड व पावनखिंडीचा विकास झाल्यास शिवकालीन ऐतिहासिक इतिहास जपला जाईल. किल्ले विशाळगड विकास आराखडा शासन दरबारी धूळ खात पडला आहे.तालुक्यातील वाड्या-वस्त्यांवरचे पिण्याच्या पाण्याचे व रस्त्यांचे प्रश्न मार्गी लागावयास हवेत. धनगरवाडे आजदेखील मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. तालुक्याच्या निम्म्या वाड्या-वस्त्यांवर रस्ता व दळणवळणाची सुविधा उपलब्ध नाही. पावसाळ्यात विद्यार्थी-नागरिकांना जीव मुठीत घेऊन पाण्यातून प्रवास करावा लागतो. कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झालेली आहे. डोंगरी तालुक्यात नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बांबवडे येथे ग्रामीण रुग्णालय होणे गरजेचे आहे, तर मलकापूर नगरपरिषदेची हद्दवाढ होणे गरजेचे आहे.