लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पर्यायी शिवाजी पुलाच्या अर्धवट रेंगाळलेल्या कामाबाबत जिल्हा नागरी कृती समितीतर्फे गुरुवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (राष्टÑीय रस्ते महामार्ग) अधिकाºयांना घेरावो घालत जाब विचारला. पुलाला अंतिम मंजुरी मिळाल्याची जाहिरातबाजी करून जनतेची फसवणूक केल्याचा आरोपही यावेळी केला. प्राचीन स्मारके, पुरातत्त्व जागा जतन कायद्यातील बदलांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली; त्याला लोकसभेची मंजुरी मिळाल्यानंतरच हे काम मार्गस्थ लागणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता व्ही. आर. कांडगावे यांनी आंदोलकांना दिली.कार्यालयाच्या आवारात झालेल्या चर्चेवेळी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी अधिकाºयांवर शिवाजी पुलाच्या अर्धवट कामाबाबत प्रश्नांचा भडिमार केला. यावेळी कांडगावे यांनी, लोकसभेतील अंतिम मंजुरीनंतरच शिवाजी पुलाचे काम पूर्णत्वास येणार असल्याचे सांगितले. त्यासाठी आमच्याकडून फेरप्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी आंदोलनात माजी महापौर आर. के. पोवार, बाबा पार्टे, अशोक पोवार, रमेश मोरे, अजित सासने, हर्षल सुर्वे, वसंतराव मुळीक, किशोर घाटगे, दिलीप पवार, रघुनाथ कांबळे, चंद्रकांत बराले, महादेव पाटील, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, नीलेश देसाई, सुनील देसाई, एम. बी. पडवळे, शंकरराव शेळके, संभाजीराव जगदाळे, आदी सहभागी झाले होते.तक्रार अद्याप मागे नाहीया पुलाच्या कामात प्रथम अडचणी उभा करणाºयांचा निषेध केला पाहिजे, असा विषय काहींनी मांडला. त्यावेळी या पुलाच्या कामात अडथळा करणारी झाडे तोडण्यास विरोध करणारी तक्रार दिलीप देसाई आणि उदय गायकवाड यांनी केल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संपत अबदागिरी यांनी आंदोलकांना दिली; पण ही तक्रारही त्यांनी अद्याप मागे घेतली नसल्याचीही माहिती दिलीपालकमंत्री, तीन खासदारांच्या दारात आंदोलनपुलाच्या अर्धवट बांधकामास मंजुरी मिळाल्याची चुकीची जाहिरातबाजी केल्याबद्दल आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली. हे काम त्वरित मंजूर करावे यासाठी दिवाळीनंतर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह जिल्ह्यातील तीन खासदारांच्या निवासस्थानासमोर कृती समिती आंदोलन करणार असल्याची माहिती यावेळी अशोक पोवार, रमेश मोरे आदींनी दिली. दरम्यान, दिवाळी दिवशी पालकमंत्री पाटील यांच्या निवासस्थानासमोर अभ्यंग स्नान करणार असल्याचे किसन कल्याणकर यांनी सांगितले.सत्कार आणि संतापशिवाजी पुलाच्या उर्वरित कामाला मंजुरी मिळाल्याचे आम्हाला गाजर दाखविले म्हणून आम्ही लोकप्रतिनिधींचा सत्कार केला. हे पुलाचे काम त्वरित पूर्ण व्हावे हाच यामागे उद्देश असल्याचेही आर. के. पोवार यांनी सांगितले; पण येथे आमची फसवणूक झाल्याचे लक्षात येत आहे.