कोल्हापूर : येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांच्याशी माजी विद्यार्थ्यांनी संपर्क साधून रविवारी शिक्षक दिनानिमित्त पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.
राष्ट्रीय जलतरणपटू पृथ्वीराज जगताप यांच्या हस्ते कार्याध्यक्ष साळुंखे यांचा पुष्पगुच्छ, शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. जगताप म्हणाले, साळुंखे सरांनी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्राला तितकेच महत्त्व दिले, त्यामुळे अनेक खेळाडू घडविण्याचे मोलाचे काम त्यांच्याकडून झाले आहे. प्राचार्य अभयकुमार साळुंखे म्हणाले, बापूजींनी उभारलेली ज्ञानसंस्था बहुजन समाजातील मुलांना ज्ञान देणारी एक आदर्शवत संस्था आहे. त्यांनी शैक्षणिक विचारांची पालखी घेऊन जाणाऱ्या कृतिशील गुरुदेव कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली. त्याग, सेवा, जिद्द, चिकाटीने सतत कार्यरत राहिल्याने संस्थेचा विकास साधला जाणार आहे. यावेळी स्वप्नील खोत, रणजित जगताप, तेजस जिरगे, राहुल चौधरी आदी उपस्थित होते.
फोटो नं. ०५०९२०२१-कोल-सत्कार०१
ओळ : कोल्हापुरात शिक्षक दिनानिमित्त रविवारी माजी विद्यार्थ्यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांच्याशी संपर्क साधून रविवारी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
050921\05kol_6_05092021_5.jpg
ओळ : कोल्हापूरात शिक्षक दिनानिमीत्त रविवारी माजी विद्यार्थ्यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांच्याशी संपर्क साधून रविवारी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.