अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. संजय पाटील होते. जिल्हा परिषदेचे सदस्य मनोज फराकटे, माजी विद्यार्थी व संस्थेचे संचालक नेताजी पाटील प्रमुख उपस्थित होते.
यावेळी प्रा. आर. बी. चोपडे यांनी ‘नॅक’संदर्भात माजी विद्यार्थी संघाची भूमिका विशद केली. प्रमोद तौंदकर, डॉ. हेमराज यादव, राजेंद्र पाटील,सुभाष पाटील, उमाजी कुंभार, प्रकाश महाडेश्वर, शशिकांत कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष प्रवीण खोळंबे, सेक्रेटरी संतोष ढवण, प्रा. ए. बी. माने, रामदास फराकटे ,धनाजी साठे, हिंदुराव खोत, तानाजी हातकर, अशोक कुदळे, एम. जी. फराकटे, संजय जोशी यांच्यासह प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते. डॉ. एस. एन. कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. समीर पाटील यांनी सूत्रसंचालन केले; तर पांडुरंग चिंदगे यांनी आभार मानले.