कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या किरणोत्सवात गुरुवारी मावळतीची सूर्यकिरणे अंबाबाई मूर्तीच्या गळ्यापर्यंत आली. आज शुक्रवारी किरणोत्सवाचा तिसरा दिवस असून, आज किरणे चेहऱ्यावर येऊन पूर्ण क्षमतेने हा सोहळा होण्याची शक्यता आहे.अंबाबाईच्या किरणोत्सवाचा गुरुवारी दुसरा दिवस होता. थंडी व धुके असले तरी किरणांची तीव्रता चांगली होती. सायंकाळी ५ वाजून १ मिनिटानी सूर्यकिरणांनी महाद्वारातून अंबाबाई मंदिरात प्रवेश केला. गरुड मंडप, शंखतीर्थ चौक, पितळी उंबरा, चांदीचा उंबरा असा प्रवास करत किरणांनी ५ वाजून ४४ मिनिटांनी अंबाबाई मूर्तीचा चरणस्पर्श केला. ५ वाजून ४८ मिनिटांनी गळ्यापर्यंत येऊन डावीकडे लुप्त झाली. या वेळी देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे, मंदिर अभ्यासक गणेश नेर्लीकर, प्रा. मिलिंद कारंजकर उपस्थित होते.
सूर्यकिरणांचा प्रवास असावेळ : प्रवास५ वाजून १ मिनिटे : महाद्वार५ वाजून ९ मिनिटे : गरुड मंडप५ वाजून २७ मिनिटे : गणपती चौक५ वाजून ३१ मिनिटे : शंखतीर्थ चौक५ वाजून ३४ मिनिटे : पितळी उंबरा५ वाजून ३६ मिनिटे : खजिना चौक५ वाजून ३८ मिनिटे : चांदीचा उंबरा५ वाजून ४४ मिनिटे : चरणस्पर्श५ वाजून ४५ मिनिटे : गुडघ्यापर्यंत५ वाजून ४६ मिनिटे : कमरेपर्यंत५ वाजून ४७ मिनिटे : खांद्यापर्यंत५ वाजून ४८ मिनिटे : गळ्यापर्यंत