शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

अंबाबाई मूर्तीचे होणार ३१ आॅगस्टपर्यंत संवर्धन

By admin | Published: June 10, 2015 12:53 AM

अधिकाऱ्यांची आज पाहणी : रासायनिक संवर्धन प्रक्रियेला केंद्रीय पुरातत्त्व खात्याची मान्यता

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मूर्तीच्या संवर्धनासाठी करण्यात येणाऱ्या रासायनिक प्रक्रियेला (केमिकल कॉन्झर्वेशन) केंद्रीय पुरातत्त्व खात्याने मान्यता दिली आहे. या प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणून आज, बुधवारी केंद्रीय पुरातत्त्व खात्याचे अधिकारी अंबाबाई मूर्तीची पाहणी करणार आहेत. ३१ आॅगस्टच्या आत मूर्तीवर रासायनिक संवर्धन होणार आहे. अंबाबाईच्या मूर्तीवर वज्रलेप करावा की करू नये, या विषयावर १४ वर्षे न्यायालयात खटला सुरू होता. श्रीपूजकांच्या पुढाकाराने हा खटला वैकल्पिक वाद निवारण केंद्राकडे वर्ग होऊन काही महिन्यांपूर्वीच वादी-प्रतिवादींचे केमिकल कॉन्झर्वेशनवर एकमत होऊन हा विषय निकाली निघाला. त्यानंतर केमिकल कॉन्झर्वेशनचा हा प्रस्ताव केंद्राकडे गेला. मात्र, त्यावर केंद्राकडून कोणतेही उत्तर किंवा प्रतिसाद न मिळाल्याने हा विषय रखडला होता. काही दिवसांपूर्वी कोल्हापुरात भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक झाली. यानिमित्ताने कोल्हापुरात आलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना श्रीपूजक मंडळाने मूर्तीच्या सद्य:स्थितीची माहिती दिली. तसेच केंद्रीय पुरातत्त्व खात्याकडून ही संवर्धनाची प्रक्रिया केली जावी, या मागणीचे निवेदन दिले. शहा यांनी तातडीने हा विषय मार्गी लावत औरंगाबाद येथील केंद्रीय पुरातत्त्व खात्याला मूर्तीवर केमिकल कॉन्झर्वेशन करण्याचे आदेश दिले. त्यानुसार अधिकारी सिंग यांनी दूरध्वनीवरून श्रीपूजक मंडळाशी संपर्क साधून या आदेशाची माहिती दिली. न्यायालयीन आदेशानुसार ३१ आॅगस्टच्या आत अंबाबाई मूर्तीवर केमिकल कॉन्झर्वेशन करणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी आज केंद्रीय पुरातत्त्व खात्याचे अधिकारी अंबाबाईच्या मूर्तीची पाहणी करणार आहेत. त्यांचा, मूर्तीची सद्य:स्थिती, करण्यात येणारी रासायनिक प्रक्रिया, त्यासाठी येणारा खर्च, लागणारा कालावधी, याबाबतचा अहवाल येईल. केमिकल कॉन्झर्वेशनसाठी लागणारा खर्च हा देवस्थान समितीने करायचा व धार्मिक विधींसाठी येणारा खर्च श्रीपूजकांनी करायचा, असे निकालाच्या नोटिफिकेशनमध्ये नमूद आहे. त्यानुसार हा खर्च विभागला जाईल.