कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात येणाऱ्या लाखो भाविकांना सहजसुलभ दर्शन व्हावे, याकरिता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे मंदिर परिसर स्वच्छता, दर्शनमंडप उभारणी, सीसीटीव्ही कॅमेºयांची सज्जता, धातुशोधक यंत्रे, आदींची तयारी रविवारी पूर्ण झाली आहे. दरम्यान, रविवारी दिवसभर राज्यातील अनेक भागांतून आलेल्या मंडळांनी ज्योत नेली.अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर रविवारी मंदिराच्या परिसरावर ‘तिसरा डोळा’ अर्थात सीसीटीव्हीचे जादा कॅमेरे बसवून घेतले. त्यामुळे भाविकांचे चोरांपासून संरक्षण होणार आहे. याकरिता देवस्थानने विशेष कक्षाचीही स्थापना केली आहे. विविध गायक, भजनी मंडळांना सादरीकरणासाठी गारेच्या गणपतीसमोर व्यासपीठही तयार केले आहे. रविवारी परिसरातील फरशीचीही स्वच्छता केली. भवानी मंडपातील ऐतिहासिक कमानही मनपातर्फे स्वच्छ केली. दरम्यान, परजिल्ह्यांतील शारदीय नवरात्रौत्सव मंडळांनीही ज्योत प्रज्वलित करण्यास प्रारंभ केला. यात बीड, उस्मानाबाद, पुणे, अहमदनगर, आदी जिल्ह्यांतील मंडळांचा समावेश होता.बुधवार (दि. १०)पासून येणाºया लाखो भाविकांची संख्या लक्षात घेता, महालक्ष्मी अन्नछत्रालय व भक्त मंडळाने धर्मशाळा चोवीस तास खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासह अन्नछत्रालयाची वेळही एक तासाने वाढविली आहे. एकाच वेळी आठ हजार भाविकांना प्रसादाचा लाभ घेता यावा, अशी व्यवस्थाही केली आहे. सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत प्रसादाचा लाभ घेता येणार आहे.तिसºया डोळ्याचीनजर अशीमंदिराच्या चारीही दरवाजांसह मंदिरप्रवेश करताना पाच धातुशोधक मेटल डोअर फ्रेम डिटेक्टर, १० हॅँड मेटल डिटेक्टर, परिसरात एकूण ५५ सीसीटीव्ही कॅमेरे, १५ बिनतारी संदेश यंत्रणा अशी सुरक्षितता पश्चिम महाराष्ट्र देवस्थानतर्फे सज्ज केली आहे.यासह देवस्थान समितीच्या कार्यालय, जुना राजवाडा पोलीस ठाणे, इमर्जन्सी कंट्रोल रूम अशा तीन ठिकाणांहून या परिसरातील भाविकांच्या हालचालींवर नजर ठेवली जाणार आहे.
नवरात्रौत्सवासाठी अंबाबाइ मंदिराचा परिसर सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2018 11:56 PM