ठळक मुद्देअंबाबाई मंदिरात ‘कुंकुमार्चन ’ उत्साहात; ७५० हून अधिक महिला भाविकांचा सहभागदेवस्थान समितीतर्फे केरळातील पुरग्रस्तांसाठी १0 लाखांचा निधी
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे अंबाबाई मंदिरातील गारेच्या गणपती चौकात कुंकुमार्चन विधी उत्साहात झाला. यात ७५० हून अधिक महिलांनी सहभाग घेतला होता. तर देवस्थान समितीतर्फे केरळातील पुरग्रस्तांसाठी १0 लाखांचा निधीही जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केला.
कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील गारेच्या गणपती चौकात ‘कुंकुमार्चन’ विधी सोहळ्यात महिला भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या./छाया : आदित्य वेल्हाळअंबाबाई मंदिरात प्रत्येक शुक्रवारी देवस्थानतर्फे गरुड मंडप येथे देवीचा कुंकुमार्चन विधी संपन्न होतो. त्यास महिलांचा मोठा प्रतिसाद लाभतो. त्यात दररोज हजारो महिलांची या विधीसाठी समितीकडे नाव नोंदणी होते. जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ घेता यावा, यासाठी समितीतर्फे शुक्रवारी दुपारी ५०१ महिलांकरिता हा विधी आयोजित करण्यात आला होता. त्यात ७५० हून अधिक महिलांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.
या उपक्रमात सहभागी महिलांना ‘श्रीयंत्र ’, हळद-कुंकू, प्रसाद आणि साहित्य देवस्थानतर्फे पुरवण्यात आले होते. एकाचवेळी ७५० हून अधिक महिलांनी एकत्रितपणे कुंकुमार्चनमध्ये सहभाग नोंदवला. संपूर्ण विधी योगेश व्यवहारे आणि सुदाम सांगले पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली झाला.
कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील गारेच्या गणपती चौकात ‘कुंकुमार्चन’ विधी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात महिला भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या./छाया : आदित्य वेल्हाळदेवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यानिमित्त बोलताना म्हणाले, महिलांचा वाढता प्रतिसाद पाहून हा विधी यापुढे मोठ्या प्रमाणात राबविला जाईल. त्याचा लाभ स्थानिक भाविकांसह बाहेरून आलेल्या भक्तांनाही होईल. यासह देवस्थानतर्फे सुरू असलेल्या आरोग्य केंद्रातून तीन हजारांपेक्षा अधिक रुग्णांनी लाभ घेतल्याची माहितीही त्यांनी दिली. प्रतिसाद पाहून देवस्थानतर्फे रुग्णवाहिकेचीही सोय केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, सदस्या संगीता खाडे, शिवाजी जाधव, सचिव विजय पोवार, सहसचिव शिवाजी साळवी, सुदेश देशपांडे, व्यवस्थापक धनाजी जाधव यांच्यासह भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे केरळातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी १० लाखांचा निधी शुक्रवारी देवस्थानचे अध्यक्ष महेश जाधव, कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, सदस्य शिवाजी जाधव, सदस्या संगीता खाडे, विजय पोवार, आदींच्या उपस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्याकडे सुपूर्द केला./छाया : आदित्य वेल्हाळ
केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी १० लाख रुपयांचा निधीदेवस्थान समितीच्या सामाजिक सहायता निधीतून केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी १० लाख रुपयांचा निधी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्याकडे प्रातिनिधीक स्वरूपात अध्यक्ष महेश जाधव यांनी सुपूर्द केला. हा निधी केरळ मुख्यमंत्री साहाय्यता निधीकडे समितीतर्फेच पाठविला जाणार आहे. यासह पोलीस कल्याण निधीसाठी २ लाखांचा धनादेश शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्याकडे सुपूर्द केला.