कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे मंदिर अंतर्बाह्य विद्युत रोषणाईने उजळून निघाले. यंदा मंदिरात भाविकांना प्रवेश नसल्याने गणपती चौक ते गाभाऱ्यापर्यंत विविध रंगांची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नवरात्रौत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.नवरात्रौत्सवाला आता एक दिवस राहिला आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून सुरू असलेली तयारीदेखील अंतिम टप्प्यात आली आहे. मंदिराची रंगरंगोटी, स्वच्छता पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी अंतर्गत भागात वेगवेगळ्या रंगांची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
यावर्षी मंदिरात भाविकांना प्रवेश नसल्याने ही रोषणाई केली असून, त्यामुळे मंदिराचे सौंदर्य अधिक खुलले आहे. यंदा मंदिराबाहेर मांडव घालण्यात आलेला नाही. मात्र, देवस्थान समितीच्या कार्यालयाबाहेर छोटा मांडव सजला आहे.