कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त झालेल्या गर्दीचे सगळे उच्चांक मोडत रविवारी ३ लाख २० हजार भाविकांनी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. शुक्रवारनंतर ही यंदाच्या नवरात्रौत्सवातील मोठी गर्दी होती. गर्दीमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली. गेल्या नऊ दिवसांत २० लाख ७२ हजार ६५ भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. उत्सवाच्या पहिल्या दिवसापासून देवस्थान समिती व पोलिसांच्या वतीने नागरिकांना व्हीआयपी दर्शनासाठी सोडले जात होते. मात्र अष्टमी आणि रविवारचा दिवस असल्याने या दोन्ही व्यवस्थापनांनी व्हीआयपी दर्शन बंद ठेवले होते. महिषासूरमर्दिनी रूपात पूजाअष्टमीनिमित्त रविवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची महिषासूरमर्दिनी रूपात पारंपरिक पूजा बांधण्यात आली. अष्टमीला अंबाबाईने (दुर्गेने) महिषासुराचा वध केला. (प्रतिनिधी)
अंबाबाईच्या दर्शनासाठी गर्दीचा विक्रम!
By admin | Published: October 10, 2016 5:36 AM