शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवार यादीआधीच १७ जणांना एबी फॉर्म; अजित पवार गट उद्या जाहीर करणार यादी
2
आजचे राशीभविष्य: स्त्रियांशी काळजी पूर्वक व्यवहार करावेत, पैसा आणि कीर्ती यांची हानी संभवते
3
बहिणीसाठी धारावीच्या जागेचा गायकवाडांचा आग्रह; नेत्यांचे म्हणणे- कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या!
4
फडणवीस-ठाकरे कथित भेटीच्या चर्चेचा धुरळा; काँग्रेस-उद्धवसेना म्हणते, यात तथ्य नाही!
5
११ आमदारांचे मताधिक्य ‘नोटा’पेक्षाही होते कमी; २०१९ विधानसभा निवडणुकीत काय घडलं होतं?
6
जागावाटप अन् नाराजीनाट्याचा पहिला अंक! महायुतीत धुसफुस, महाविकास आघाडीत दिलजमाई
7
भाजपाने नाकारले; संदीप नाईक यांच्या हाती तुतारी; वाशीत आज शरद पवार गटात जाहीर प्रवेश?
8
LAC वर गस्त घालणार, भारत-चीनमध्ये करार; मोदी-जिनपिंग यांच्यात चर्चा होण्याची शक्यता
9
महायुतीतर्फे मुंबईत सात, तर मविआ देणार तीन महिला; शरद पवार गटातून कुणीही नाही?
10
जिल्ह्यातील ओबीसी नेता अशा ओळखीमुळे किसन कथोरे यांना पुन्हा संधी; सूत्रांची माहिती
11
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आज उघडणार दालनाचे द्वार! २९ ऑक्टोबरपर्यंत निवडणुकीची प्रक्रिया
12
कल्याण पूर्व विधानसभा: भाजपच्या सुलभा गायकवाड यांना शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध
13
पुणे बंगळुरू हायवेवर खासगी वाहनात सापडली कोट्यवधीची रोकड; सत्ताधारी आमदाराकडे बोट?
14
आमदार चंद्रकांत पाटलांचा CM एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश
15
मविआच्या जागावाटपाची तारीख ठरली! काँग्रेसच्या बैठकीनंतर चेन्निथलांनी दिली महत्त्वाची माहिती
16
प्रेयसीची ‘दृश्यम स्टाईल’नं हत्या, मृतदेह पुरून केलं फ्लोअरिंग; आरोपीला अटक
17
सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये देणार; CM एकनाथ शिंदेंचं आश्वासन
18
भारत-कॅनडा वादावर जयशंकर यांनी मौन सोडले, उच्चायुक्तांना परत बोलवण्याचे कारण सांगितले
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "त्यांना तिकडे उभे राहायचे असेल तर मी..."; संदीप नाईकांचे बंडखोरीचे संकेत, गणेश नाईकांनी दिली प्रतिक्रिया
20
विले पार्लेत महायुतीची डोकेदुखी वाढली! शिवसेना नेते दीपक सावंत लढणार अपक्ष

तिसऱ्या दिवशी किरणे मूर्तीच्या गळ्यापर्यंत अंबाबाईचा किरणोत्सव : आज पूर्ण होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 7:15 AM

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दक्षिणायण किरणोत्सवात रविवारी सूर्यकिरणे देवीच्या मूर्तीच्या गळ्यापर्यंत येऊन डावीकडे लुप्त झाली. सायंकाळी पाच वाजून ...

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दक्षिणायण किरणोत्सवात रविवारी सूर्यकिरणे देवीच्या मूर्तीच्या गळ्यापर्यंत येऊन डावीकडे लुप्त झाली. सायंकाळी पाच वाजून १८ मिनिटांनी महाद्वारपासून प्रवास सुरू केलेली किरणे पाच मिनिटे मूर्तीवर स्थिरावली. आज, सोमवारी किरणे चेहऱ्यावर येऊन किरणोत्सव पूर्ण होण्याची शक्यता आहे.

मंदिरशास्त्राचा अद‌्भुत नमुना असलेल्या अंबाबाई मंदिरात सध्या दक्षिणायन किरणोत्सव सोहळा सुुरू आहे. रविवारी या किरणोत्सवाचा तिसरा दिवस होता. सध्या थंडी सुुरू असल्याने सूर्यास्त लवकर होत आहे; शिवाय किरणे मूर्तीवर येईपर्यंत त्यांची तीव्रताही कमी होत आहे. अशा वातावरणातही शनिवारी (दि. ३०) देवीच्या मूर्तीचा चरणस्पर्श केलेली किरणे रविवारी पुढचा प्रवास करीत मूर्तीच्या गळ्यापर्यंत आली. सायंकाळी ५ वाजून १८ मिनिटांनी महाद्वार कमानीतून आत आलेल्या किरणांनी गरुड मंडप, कासव चौक, पितळी उंबरा असे टप्पे पार करीत ६ वाजून १४ मिनिटांनी मूर्तीचा चरणस्पर्श केला. गुडघ्यापासून गळ्यापर्यंतचा चार मिनिटांचा प्रवास करीत ती ६ वाजून १८ मिनिटांनी लुप्त झाली.

रविवार असल्याने मंदिराच्या आवारात भाविकांची मोठी गर्दी होती. सर्व भक्तांना या सोहळ्याचा लाभ घेता यावा, यासाठी एलईडी स्क्रीन लावण्यात आला होता. तसेच ध्वनिक्षेपकावरून या सोहळ्याची माहिती दिली जात होती.

----किरणांचा प्रवास असा

५ वाजून १८ मिनिटे : महाद्वार रोड ५ वाजून ४६ मिनिटे : गरुड मंडप

६ वाजता : कासव चौक

६ वाजून ७ मिनिटे : पितळी उंबरा

६ वाजून १२ मिनिटे : दुसरी पायरी

६ वाजून १४ मिनिटे : चरणस्पर्श

६ वाजून १५ मिनिटे : गुडघ्यापर्यंत

६ वाजून १८ मिनिटे : गळ्यापर्यंत

---

फोटो नं ३१०१२०२१-कोल-किरणोत्सव

ओळ : कोल्हापुरातील श्री अंबाबाईच्या दक्षिणायन किरणोत्सवात रविवारी सूर्याची किरणे मूर्तीच्या गळ्यापर्यंत आली होती. (छाया : आदित्य वेल्हाळ)

............................