कोल्हापूर : टेंबलाई, कात्यायनी, निनाई, काली, चामुंडा, वेताळ, जोतिबा अशा विविध दैवतांच्या सहकार्याने अंबाबाईने आपल्या पराक्रमाचा इतिहास गाजवला. नागाला तिने मोठा भाऊ मानून शिरावर धारण केले; तर विष्णूने त्याला पायदळी ठेवले. लक्ष्मी अबलेचे प्रतीक आहे. अंबाबाई ही शौर्याची, जनतेचे रक्षण करणारी, समृद्धतेची देवता व आदिशक्ती आहे. म्हणून ‘अंबाबाई’ या नावाचा आग्रह आहे. या अंबाबाईच्या लक्ष्मीकरणाचा डाव हाणून पाडूया, असे आवाहन प्रा. डॉ. राजेंद्र कुंभार यांनी केले. करवीरनिवासिनी अंबाबाई भक्त मंडळाच्यावतीने शाहू स्मारक भवनमध्ये आयोजित ‘शोध अंबाबाईचा’ या व्याख्यानात त्यांनी मंगळवारी दुसरे पुष्प गुंफले. व्यासपीठावर मंडळाचे सहकार्यवाह वसंतराव मुळीक, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, ज्येष्ठ चित्रकार श्यामकांत जाधव उपस्थित होते. कुंभार म्हणाले, हा वाद अंबाबाई व लक्ष्मी एवढ्या संघर्षापुरता मर्यादित नाही; तर तो दोन संस्कृतींमधील आहे. स्त्रीला अबला आणि क्षुद्र मानणाऱ्या, तिचे केवळ नवऱ्याचे पाय चेपणारी स्त्री इतकेच स्थान ठेवणाऱ्या मानसिकतेविरुद्धचा हा लढा आहे. कारण अंबाबाई ही पराक्रमी राज्यकर्ती होती. कोल्हापूरभोवती वसलेली सर्व दैवते तिला सहकार्य करीत होती. ‘नऊ दिवसांच्या नऊ माळा, अंबा बसली नवचंडी...’ असे वर्णन असणारी ही देवी सुख-समृद्धीचे प्रतीक आहे. ‘उदे गं अंबे उदे’ या गोंधळातून आम्ही ‘अंबे, आमचा उदय कर,’ अशी आळवणी करतो. अंबाबाईच्या या पराक्रमी संस्कृतीत लक्ष्मीचे स्थान कुठेही नाही. दिलीपराव पाटील यांनी स्वागत केले. वसंतराव मुळीक यांनी प्रास्ताविक केले. बबनराव रानगे यांनी सूत्रसंचालन केले. रामदास पाटील यांनी आभार मानले. आता गप्प बसणार नाहीअंबाबाई मूर्तीवरील नागचिन्ह पुजाऱ्यांनी आधी घालविले. सिंहाचे विद्रूपीकरण केले. आपण एवढे करूनही कोल्हापूरचे लोक काही करीत नाहीत, या समजुतीतून नवरात्रात देवीची फक्त कमळातील लक्ष्मीच्या रूपातीलच पूजा बांधून पुजाऱ्यांनी आमच्या वर्मावर बोट ठेवत आव्हान दिले आहे. या पूजांतून त्यांचा उद्देश दिसतो; पण ठरवून तुम्ही अंबाबाईचे लक्ष्मीकरण कराल तर याद राखा, असा इशारा यावेळी दिला.भक्तांचे प्रश्नसिद्धिविनायक, तिरूपती, पंढरपूर, साई अशा देवस्थानांसारखी व्यवस्था आपल्याकडे कधी ?अंबाबाईला आलेले हिरेजडित नेत्र स्वत:च्या घरी नेणारे कोण होते?दरवर्षी अंबाबाईला अर्पण केलेले कोट्यवधींचे दागिने कोठे जातात ?२००० साली देवीच्या मूर्तीवरील नागचिन्हासह इतर प्रतीके नष्ट करणारे कोण होते?मूर्ती संवर्धन होऊ नये म्हणून कोर्टबाजी करणारे कोण होते?अंबाबाईला अर्पण केलेल्या साड्या, खण, नारळ, पेढे, अलंकार यांचा व्यापार करणारे कोण?
अंबाबाईचे ‘लक्ष्मीकरण’ हाणून पाडूया
By admin | Published: October 21, 2015 12:37 AM