कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर उद्या, गुरुवारी श्री अंबाबाई मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याची स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन बंद असणार आहे.सोमवारपासून संजय मेंटेनन्सच्या वतीने अंबाबाई मंदिराच्या परिसराची स्वच्छता केली जात आहे. त्याअंतर्गत देवीचा मुख्य गाभारा उद्या, गुरुवारी स्वच्छ करण्यात येणार आहे; त्यामुळे देवीच्या नित्य धार्मिक विधीत बदल करण्यात आले आहेत. या दिवशी देवीची पहाटेची आरती व अभिषेक होईल. सकाळी आठच्या आरतीनंतर देवीला इरलं पांघरण्यात येईल. त्यानंतर गाभारा स्वच्छतेला सुरुवात होईल; मात्र परस्थ भाविकांना दर्शनाचा लाभ मिळावा, यासाठी देवीची उत्सवमूर्ती सरस्वती मंदिराजवळ ठेवण्यात येणार आहे.सायंकाळी सातनंतर पुन्हा देवीला अभिषेक व अलंकारिक पूजा केल्यानंतर मूळ मूर्ती दर्शनासाठी खुली होईल. आज, बुधवारी दुपारी दोननंतर मंदिराच्या पितळी उंबºयाच्या आतील परिसर स्वच्छ करण्यात येणार आहे; त्यामुळे भाविकांना पितळी उंबºयाच्या बाहेरूनच दर्शनाचा लाभ घेता येईल.दीपमाळा, सज्जाची स्वच्छता; मंडप उभारणीला सुरुवातशारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात सोमवारपासून मंडप उभारणीला सुरुवात झाली, तर दीपमाळा, सज्जा याची पाण्याने स्वच्छता केली. शिखराचे रंगकाम मंगळवारी पूर्ण झाले. रविवार (दि. ३०) पासून अंबाबाई मंदिर शिखराची स्वच्छता सुरू केली आहे. याचे काम मुंबईच्या एस. एम. एस. या प्रा. लि. संस्थेला दिले आहे. उद्या, गुरुवारपासून देवीच्या अलंकारांचीही स्वच्छता करण्यात येणार आहे.शहरात तीन ठिकाणी लाईव्ह दर्शनासाठी प्रयत्नशहरातील अन्य भाविकांनाही श्री अंबाबाईचे थेट दर्शन घडावे यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने प्रयत्न सुरू आहेत. शहरात सध्या ज्या ठिकाणी स्क्रीनची सोय आहे त्या महापालिका, राजारामपुरी, दाभोळकर कॉर्नर या तीन ठिकाणी लाईव्ह दर्शनाची सोय करण्यात येणार असून, त्यासाठी समितीची चाचपणी सुरू आहे.
अंबाबाईचे दर्शन उद्या बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2018 12:49 AM