लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : उन्हाळी सुट्ट्या, महिन्याचा दुसरा शनिवार, रविवार अशा सलग सुट्ट्या जोडून आल्याने शुक्रवारी करवीरनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. एका दिवसात जवळपास एक लाख भाविकांची नोंद झाली आहे. अंबाबाईचे माहात्म्य देशभरात पोहोचल्याने नवरात्राव्यतिरिक्त अन्य वेळीही भाविक व पर्यटकांचा कोल्हापूरकडे ओघ वाढला आहे. शुक्रवार हा देवीचा वार आहे. शिवाय या दिवशी पालखी सोहळाही असतो. आज दुसरा शनिवार असल्याने सर्व शासकीय कार्यालयांना सुट्ट्या आहेत आणि रविवार असल्याने सलग सुट्ट्यांमुळे शुक्रवारी अंबाबाई मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती. चारही दरवाजांजवळील डोअर मेटल डिटेक्टरमधून जवळपास एक लाख भाविकांनी नोंद करण्यात आली. दुपारी साडेबाराच्या दरम्यान भाविकांच्या मुख्य दर्शनरांगा मंदिराबाहेर लागल्या होत्या.
एक लाख भाविकांनी घेतले अंबाबाईचे दर्शन
By admin | Published: May 13, 2017 12:00 AM