शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात महामानवाचा पुतळा आहे. पाठीमागील बाजूस अर्धगोलाकार संरक्षक भिंत उभारली आहे. तर समोर चैत्यभूमी व दीक्षाभूमी येथील स्वागत कमानीची प्रतिकृती उभारली आहे. स्वागत कमानीवर आकर्षक असे अशोक चक्र तयार केले असून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
या पुतळ्याच्या सुशोभिकरणाच्या कामाकरिता तत्कालीन मुख्याधिकारी नागेंद्र मुतगेकर, लोकनियुक्त नगराध्यक्ष जयराम पाटील यांनी पुढाकार घेतला होता. त्यासाठी माजी नगराध्यक्ष सुरेश कडाळे, नगरसेवक अनुप मधाळे, नगरसेविका स्नेहल कांबळे, माजी उपनगराध्यक्ष गौतम ढाले आदींनी विशेष पाठपुरावा केला होता. तर काम पूर्ण करण्यासाठी मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी विशेष प्रयत्न केल्याने जयंतीदिनाच्या पूर्वसंध्येला सुशोभिकरणाचे काम झाल्याने शहरवासीयांतून समाधान व्यक्त होत आहे.
फोटो - कुरुंदवाड येथे मध्यवर्ती चौकात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे सुशोभिकरण करण्यात आले आहे.