नागरदळे (ता. चंदगड) येथील ह.भ.प. शिवाजी विष्णू पाटीललिखित ‘नागझरी’ काव्यसंग्रहाच्या प्रकाशनप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. शिवाजी पाटील यांनी स्वागत केले, नाट्यदिग्दर्शक जीवन कुंभार यांनी प्रास्ताविक केले.
शिरगुप्पे म्हणाले, शिवाजी पाटील हे अंतर्बाह्य कवी असून, त्यांच्या लेखणीत चौफेर लिखाणाचे सामर्थ्य आहे. भारतीय संस्कृती व निसर्ग साखळीत नागाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तो आपला शत्रू नसून देवता आहे. त्यामुळे ‘नागझरी’ हे काव्यसंग्रहाचे नाव यथार्थ ठरते. कवी पाटील यांनी यात नदी, झरे, मंदिर, झाडे, जीवसृष्टीचे निसर्गदर्शन घडवले आहे.
महाराष्ट्र केसरी विजेते पै. विष्णू जोशीलकर म्हणाले, रणजीत देसाई यांच्यानंतर भागात दर्जेदार साहित्यिक निर्माण होत आहेत. ही अभिमानास्पद गोष्ट आहे. अशा उदयोन्मुख कलाकार व खेळाडूंच्या मागे तालुक्यातील जनतेचे नेहमीच पाठबळ राहिले आहे. यावेळी पी.ए. पाटील, कृष्णा बामणे, मयूरी जाधव, एम.व्ही. पाटील, ए.एस. पाटील, सी.एस. गुरव आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी गंगूबाई पाटील, लक्ष्मीबाई जोशीलकर, सत्यजित पाटील, तुषार पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी ताम्रपर्णी प्रतिष्ठान कोविड आयोजित खुल्या ऑनलाइन काव्यवाचन स्पर्धेचे बक्षीस वितरणही झाले. सदानंद पाटील यांनी आभार मानले.
फोटो ओळी : नागरदळे (ता. चंदगड) येथे कवी शिवाजी पाटील यांच्या ‘नागझरी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन राजाभाऊ शिरगुप्पे, शिवाजी पाटील, जीवन कुंभार, विष्णू जोशिलकर आदी मान्यवरांच्या हस्ते झाले.
क्रमांक : १५०९२०२१-गड-०६