राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या निधीतून व ग्रामपंचायतीच्या पंधरावा वित्त आयोग निधीतून १ कोटी ३१ लाखांच्या विकासकामाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
संजय पाटील-यड्रावकर व शिरोळ पंचायत समितीचे माजी उपसभापती सत्येंद्रराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. १ कोटी ३१ लाखच्या निधीतून नागरी वस्तीमध्ये रस्ते खडीकरण, डांबरीकरण, भूमिगत गटार, नवीन स्मशानभूमी, ओपन जिम, सौरदिवे, पेव्हिंग ब्लॉक बसविणे, शौचालय, मुतारी, पिण्याच्या पाण्याची सोय, रस्ता करणे, अंगणवाडीसाठी बेंचेस खरेदी करणे, बहुउद्देशीय घंटा गाडी खरेदी, अंतर्गत गटारी आदी विकासकामांचा समावेश आहे. गावातील सर्वच भागासाठी विविध विकासकामांचा यामध्ये समावेश आहे.
याप्रसंगी सरपंच कुणालसिंह नाईक-निंबाळकर, उपसरपंच प्राची हिंगे, सरदार सुतार, जीवंधर मुरचिटे, महावीर पाटील, सचिन मगदूम, शिवाजी दळवी, शिवाजी पाटील, ग्रामसेवक व्ही. व्ही. गावडे, आनंदराव साने, दादासो दानोळे, राहुल दावाडे, ग्रामपंचायत सदस्य महेश कुंभार, बाबासो राजमाने, रोहित कदम, मोहन प्रभावळकर, अर्जुन आदमाने यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते
फोटो - १३०८२०२१-जेएवाय-०५
फोटो ओळ - यड्राव (ता. शिरोळ) येथे विकासकामांचा शुभारंभ संजय पाटील-यड्रावकर यांच्याहस्ते झाला. यावेळी कुणालसिंह नाईक-निंबाळकर, आदित्य पाटील-यड्रावकर, प्राची हिंगे, महेश कुंभार, बाबासाहेब राजमाने, सचिन मगदूम, प्रदीप हिंगे, महावीर पाटील उपस्थित होते.