येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तब्बल १० वर्षे रुग्णवाहिकेच्या प्रतीक्षेत होते. जुने वाहन कालबाह्य केल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राकडे रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. यासाठी जिल्हा परिषद सदस्य कोमल मिसाळ व पंचायत समिती सदस्य इंद्रजित पाटील यांनी सतत मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा आरोग्याधिकारी योगेश साळे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळे येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्यात आली.
यावेळी माजी जिल्हा परिषदेचे सदस्य एस. आर. पाटील, सरपंच सचिन चौगले, उपसरपंच सतीश पाटील, ग्रामपंचायत सदस्य रमेश कुंभार, दीपक व्हरगे, शिवसेना जिल्हा महिला आघाडीप्रमुख शुभांगी पोवार, सरदार मिसाळ, महालिंग लांडगे, तुकाराम पोवार यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
०६ वडणगे ॲम्ब्युलन्स
फोटोओळी : वडणगे (ता. करवीर) येथील प्राथमिक आरोग्य रुग्णवाहिका सुपूर्द करताना माजी आमदार चंद्रदीप नरके, इंद्रजित पाटील, कोमल मिसाळ, सरपंच सचिन चौगले, उपसरपंच सतीश पाटील, एस. आर. पाटील, रमेश कुंभार, दीपक व्हरगे, शुभांगी पोवार, सरदार मिसाळ, महालिंग लांडगे, आदी.
............................
फोटो koldesk ला पाठविला आहे.