कोल्हापूर : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला एएस ट्रेडर्सचा संचालक अमित अरुण शिंदे अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या निरीक्षक स्वाती गायकवाड यांच्या पथकाने गुरुवारी (दि. १७) सकाळी शिंदे याला जेरबंद केले.कमी कालावधीत मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना सुमारे तीन हजार कोटी रुपयांचा गंडा घातल्याबद्दल एएस ट्रेडर्स कंपनीसह २७ संचालकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यातील विक्रम जोतिराम नाळे, सुवर्णा श्रीरंग सरनाईक, बाळासो कृष्णात धनगर आणि बाबासो भूपाल धनगर या चौघांना पोलिसांनी अटक केली होती. आता या गुन्ह्यातील पाचवा संशयित अमित शिंदे याला आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुरुवारी सकाळी शहरातून अटक केली. तो कंपनीचा संचालक होता. तसेच गुंतवणूक वाढवण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती. त्याला आज, गुरुवारी जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्याच्या अटकेमुळे या गुन्ह्यातील महत्त्वाची माहिती, कागदपत्रे हाती लागतील, असा विश्वास तपास अधिकारी स्वाती गायकवाड यांनी व्यक्त केला.
एएस ट्रेडर्स फसवणुकीतील मोठा मासा लागला पोलिसांच्या गळाला, गुंतवणूकदारांना सुमारे तीन हजार कोटी रुपयांचा गंडा
By उद्धव गोडसे | Published: August 17, 2023 12:19 PM