शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

पॅकेजची रक्कम ३० जूनपूर्वी

By admin | Published: June 07, 2015 1:25 AM

चंद्रकांतदादांचे आश्वासन : बुधवारी मुख्यमंत्र्यांनी बोलाविली तातडीची बैठक

कोल्हापूर : राज्यातील शेतकरी व साखर कारखान्यांची आर्थिक परवड पाहून त्यांना दोन हजार कोटी रुपयांचे पॅकेज देण्याची आम्ही घोषणा केली आहे. हे पॅकेज देणारच आहोत; पण काही तांत्रिक अडचणी सोडविण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करीत आहोत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि. १०) सर्व विभागांच्या सचिवांची तातडीची बैठक बोलाविली असून, यामध्ये पॅकेजचा निर्णय होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत ३० जूनपूर्वी पॅकेजची रक्कम कारखान्यांच्या खात्यांवर जमा होईल, असे आश्वासन सहकारमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोर्चाला दिले. दोन हजार कोटींच्या पॅकेजबाबत राष्ट्रवादीने शनिवारी कोल्हापुरात मोर्चा काढला. यावेळी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाबरोबर मंत्री पाटील यांनी चर्चा केली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, एफआरपीप्रमाणे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. केवळ कोल्हापुरातील कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे पैसे दिल्याने तुम्हाला अभिमान वाटायला हवा. दादा, तुमच्या शब्दाला वजन आहे. ‘भाजप’चे राष्ट्रीय अध्यक्ष कोल्हापुरात येतात. त्यामुळे तुम्ही पॅकेजचा शब्द टाकला की, तो केंद्राने झेलला पाहिजे. तुम्ही आडनावाने पाटील आहात, दणका द्या. ‘आम्ही जात्यात आहोत, तुम्ही सुपात’, याचे भान ठेवा, असा टोला हाणत, तुम्ही विरोधात असताना आंदोलन करत होता आम्ही कधीही त्याला विरोध केला नाही. दादा, तुम्ही वैयक्तिक घेऊ नका. घोषणा केल्याप्रमाणे कारखान्यांना विनाअट पैसे देऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसा, असे मुश्रीफ यांनी सांगितले. यावर बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, पॅकेज देण्यास विलंब झाला, हे मान्य आहे. तांत्रिक अडचणी आहेत. यासाठी बुधवारी (दि. १०) वित्त, सहकार, कृषी यांसह सर्व सचिवांना मुख्यमंत्र्यांनी बोलावले आहे. पैसे थेट ट्रेझरीमधून उभे करायचे, खुल्या बाजारातून घ्यायचे, की कारखान्यांच्या कर्जाला शासकीय हमी द्यायची, अशा विविध पर्यायांची चाचपणी सुरू आहे. राज्याने बफर स्टॉक केला, तर उत्तर प्रदेशची साखर मोठ्या प्रमाणात बाजारात येईल. परिणामी, दर पुन्हा घसरतील. यासाठी केंद्रानेच बफर स्टॉक करणे गरजेचे आहे. पवारसाहेबांचा मात्रा चाललाच नाही साखर कारखानदारीला मदत मिळावी, यासाठी आठवेळा केंद्राच्या पातळीवर प्रयत्न केले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पॅकेजमधील काही रक्कम केंद्राकडून मिळेल, असे वाटत होते; पण पवार साहेबांचाही मात्रा चालला नसल्याचा चिमटा मंत्री पाटील यांनी काढला. प्रसिद्धीसाठी राष्ट्रवादीची धडपड कोल्हापुरात आंदोलनाची नवीन पद्धत, ट्रेंड पडेल त्याचबरोबर कॉलनीत सामान्य माणसे राहतात, त्यांना नाहक त्रास होईल यासाठीच मोर्चाला विरोध केला. तरीही राष्ट्रवादीने मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, नवीन केल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही, असा टोला हाणत नवीन असल्याने विरोधी पक्षाची भूमिका अजून तुम्हाला समजलेली नाही; पण जरा अंदाज घेऊन आंदोलने करा, असा सल्लाही मंत्री पाटील यांनी दिला. ‘एफआरपी’ दिली नाही तर कारवाईच विनाअट पॅकेज देणार नाही. राज्यातील ऊस उत्पादकांचे ३८०० कोटी देणे आहे, त्यातील आम्ही दोन हजार कोटी देत आहोत. उर्वरित १८०० कोटी कारखाने कसे देणार, याविषयी हमी मागणारच. पॅकेज देऊनही एफआरपीप्रमाणे पैसे शेतकऱ्यांना दिले नाहीत, तर त्या कारखान्यांवर कारवाई करणारच, असा इशारा मंत्री पाटील यांनी दिला.