शहरं
Join us  
Trending Stories
1
अबूझमाडच्या जंगलात ३० नक्षल्यांचा खात्मा; घातपाताचा डाव उधळून लावला
2
हरयाणात भाजपची हॅट् ट्रिक की, काँग्रेसचे होणार पुनरागमन? मतदानाला सुरुवात
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सार्वजनिक क्षेत्रातून प्रशंसा, कौटुंबिक व दांपत्य जीवनात सौख्य लाभेल
4
मंत्रालयात आमदारांच्या जाळीवर उड्या; विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळांसह आदिवासी आमदारांचा संताप
5
पुण्यात मित्राला झाडाला बांधून तरुणीवर सामूहिक बलात्कार; तीन नराधमांचा शाेध सुरू
6
राज्यातील अकृषक कर पूर्ण माफ; सरकारचा निर्णयांचा धडाका सुरूच, मंत्रिमंडळ बैठकीत ३३ निर्णय 
7
हावभाव बघूनच एकमेकींना समजून घेतो; शेफालीने सांगितले स्मृतीसोबतच्या ताळमेळीचे रहस्य
8
हार्दिकची १८ कोटींची  पात्रता आहे का? : मूडी
9
राज्यात आज धडाडणार राजकीय तोफा; मोदी वाशिम-ठाण्यात तर राहुल गांधी कोल्हापुरात
10
भारताचा दारुण पराभव, न्यूझीलंडची विजयी सलामी
11
धारावी प्रकल्पातील अनधिकृत बांधकामांसंदर्भात समिती; न्या. दिलीप भोसले अध्यक्ष, सहा सदस्यही नेमले
12
समाज घटकांसाठी महामंडळे; मंत्रिमंडळ बैठकीत जैन, बारी, तेली समाजासाठी महत्त्वाचे निर्णय 
13
पंतप्रधानांच्या डोळ्यात धूळफेक, अपूर्ण योजनेचे उद्घाटन
14
एकीकडे इराण म्हणतोय युद्ध नकोय, दुसरीकडे म्हणतोय इस्रायलवर हल्ले करणारच 
15
मोदींचे ठरले! ९ वर्षांनी पाकच्या दौऱ्यावर जाणार भारताचे परराष्ट्रमंत्री; ‘एससीओ’ परिषदेत हाेणार सहभागी
16
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
17
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
18
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
19
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
20
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   

कोल्हापुरात बेकारांची खाऊगल्ली; केळी, भेळ, चहा विकून कंत्राटीकरणाच्याविरोधात वेधले लक्ष

By संदीप आडनाईक | Published: October 13, 2023 7:06 PM

कोल्हापूर : राज्य सरकारने काढलेल्या कंत्राटी नोकरीच्या विरोधात शुक्रवारी संभाजी ब्रिग्रेडने कोल्हापूरातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अनोखे आंदोलन करुन सर्वांचे लक्ष ...

कोल्हापूर : राज्य सरकारने काढलेल्या कंत्राटी नोकरीच्या विरोधात शुक्रवारी संभाजी ब्रिग्रेडने कोल्हापूरातीलजिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अनोखे आंदोलन करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शेकडो सुशिक्षित बेकांरांनी कार्यालयाबाहेर उभारलेल्या तात्पुरत्या गल्लीत केळी, भेळ, चहाची विक्री करुन कंत्राटी भरतीच्या निर्णयाचा निषेध केला. केले. या आंदोलनात कुणी केळी विकली तर कुणी भेळ विकली.राज्य सरकारने शिपाई, सफाई कामगार यासारख्या किरकोळ पदाची भरती कंत्राटी पध्दतीने करण्याऐवजी आता वरिष्ठ पदावरील शासकीय कर्मचाऱ्यांचीही भरती कंत्राटी पध्दतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. याचा संभाजी ब्रिगेडने जाहीर निषेध करत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे अनोखे आंदोलन केले.आंदोलनात सहभागी झालेल्या सुशिक्षित बेकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उभारेल्या तात्पुरत्या खाऊ गल्लीत केळी, भेळ, चहा, कपडे इस्त्री, ताक, केशकर्तनालय, गाड्या दुरुस्ती, सोडा, सरबत, प्रवासी गाडी चालक, रिक्षा व्यावसायिक, इलेक्ट्रिकलचे दुकान यांच्यासह इतर खाद्यपदार्थांची प्रतिकात्मक विक्री केली. या आंदोलनात एमबीएचे शिक्षण घेतलेला युवकाने इस्त्रीवाला आणि बीएस्ससीपर्यंतचे शिक्षण घेतलेला युवकाने केळी विकली. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष निलेश सुतार, संदीप यादव, भगवान काईंगडे, सचिन पास्ते, डेव्हिड लोखंडे, रंजना पाटील, कल्पना देसाई, विकी जाधव, संगीता पाटील, संतोष कोळी यांनी भाग घेतला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरUnemploymentबेरोजगारीagitationआंदोलनcollectorजिल्हाधिकारी