शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
2
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
3
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
4
अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?
5
'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट
6
तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"
7
'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी
8
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
9
४०० पारचा प्रयत्न फसला; ३७ धावांत ४ विकेट्स! ३७६ धावसंख्येवर आटोपला टीम इंडियाचा पहिला डाव
10
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
11
Piccadily Agro Share : ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
12
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
13
Post Office Saving Scheme : Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
14
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
15
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
16
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
17
Aadhaar Card : Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
18
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
19
"पहिल्या सीझनला मला स्पर्धक म्हणून ऑफर होती", केदार शिंदेंचा खुलासा; म्हणाले, 'शो स्क्रीप्टेड...'
20
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर

पोलिस ठाण्यातच अधिकाऱ्याची महिला कर्मचाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी, कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 11:29 AM

पीडितेने दिला आत्महत्येचा इशारा

पन्हाळा : पन्हाळा पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्याने महिला कर्मचाऱ्याच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन थेट पोलिस ठाण्यातच शरीरसुखाची मागणी करण्याचा प्रताप केला आहे. याबाबत पीडित महिला कर्मचाऱ्याने संबंधित अधिकाऱ्याविरोधात पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे गुरुवारी (दि. १५) तक्रार अर्ज दिला आहे. पन्हाळा पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्याच्या काळ्या चाळ्यांमुळे हे पोलिस ठाणे सध्या बदनाम झाले आहे.पीडित महिला गेल्या चार वर्षांपासून पन्हाळा पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. या महिलेने गुरुवारी पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपली कैफियत मांडली. असहायतेचा गैरफायदा घेऊन अधिकारी त्रास देतात. विनाकारण लगट करतात. मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने रोज सकाळी तोकड्या चड्डीत ते पोलिस ठाण्यात येऊन अनावश्यक प्रश्न विचारतात. महिला कर्मचाऱ्यांना लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करतात. पीडित महिलेकडे त्याने वारंवार शरीरसुखाची मागणी केली. मात्र, संबंधित महिला कर्मचाऱ्याने अधिकाऱ्याची मागणी धुडकावून लावल्याने शारीरिक, मानसिक त्रास दिला जात आहे.पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून, तातडीने चौकशी अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. अधिकाऱ्यानेच महिला कर्मचान्याशी गैरवर्तन केल्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

पीडितेने दिला आत्महत्येचा इशारा

  • अन्यायाविरोधात दाद मागणाऱ्या पीडित महिला कर्मचाऱ्याने संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे.
  • योग्य न्याय मिळाला नाही, तर पोलिस महासंचालकांपर्यंत तक्रार देऊन मुलासह आत्महत्या करण्याचा इशाराही पीडित महिलेने दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. 
टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीWomenमहिला