शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

शाहू महाराजांच्या ऋणात राहण्यातच आनंद- कैलासचंद्र पटेल : राजर्षी कृतज्ञता परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 1:10 PM

राजर्षी शाहू महाराजांनी १०० वर्षांपूर्वी सर्व समाजांच्या उद्धाराचे कार्य केले. त्याकाळी कोणतीही दळणवळणाची साधने नसताना एक राजा १५०० किलोमीटर दूरचा प्रवास करून, कानपूरसारख्या गावातील कुर्मी समाजाने दिलेली ‘राजर्षी’ पदवी स्वीकारतो हे महाराजांनी आमच्यावर केलेले ऋण आहे. त्यांनी केलेल्या कार्याच्या आणि स्नेहाच्या धाग्याने कोल्हापूर आणि उत्तरप्रदेश जोडले आहे. आपल्या ऋणात राहण्यातच आम्हाला आनंद आहे. महाराजांच्या विचारांनीच देशाची प्रगती होईल, असे प्रतिपादन अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेचे मंडल अध्यक्ष कैलासचंद्र पटेल यांनी केले.

ठळक मुद्देशाहू महाराजांच्या ऋणात राहण्यातच आनंद- कैलासचंद्र पटेल : राजर्षी कृतज्ञता परिषद

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांनी १०० वर्षांपूर्वी सर्व समाजांच्या उद्धाराचे कार्य केले. त्याकाळी कोणतीही दळणवळणाची साधने नसताना एक राजा १५०० किलोमीटर दूरचा प्रवास करून, कानपूरसारख्या गावातील कुर्मी समाजाने दिलेली ‘राजर्षी’ पदवी स्वीकारतो हे महाराजांनी आमच्यावर केलेले ऋण आहे. त्यांनी केलेल्या कार्याच्या आणि स्नेहाच्या धाग्याने कोल्हापूर आणि उत्तरप्रदेश जोडले आहे. आपल्या ऋणात राहण्यातच आम्हाला आनंद आहे. महाराजांच्या विचारांनीच देशाची प्रगती होईल, असे प्रतिपादन अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेचे मंडल अध्यक्ष कैलासचंद्र पटेल यांनी केले.शाहू स्मारक भवनात राजर्षी शाहू सामाजिक सलोखा मंच व अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे आयोजित ‘राजर्षी कृतज्ञता परिषदे’त ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शाहू छत्रपती होते. यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार व डॉ. रमेश जाधव यांना ‘राजर्षी शाहू विचार पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी महापौर सरिता मोरे, उपमहापौर भूपाल शेटे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक, अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेचे डॉ. राजकुमार सचान, अ‍ॅड. शशिकांत सचान, संजेशकुमार कटियार, गणी आजरेकर उपस्थित होते.पटेल म्हणाले, बहुजनांना शिक्षण, स्त्रीउद्धार, जातिभेदांचा नाश करण्यासाठी झटणारे शाहू महाराज सर्वसमावेशक विकासाचे रोल मॉडेल होते. त्याकाळी ब्रिटिशांसोबत संघर्ष करत असलेल्या कुर्मी समाजाकडून त्यांनी सन्मान स्वीकारला, त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. अलौकिक प्रतिभा आणि त्यागातूनच ते राजर्षी झाले. आज जातीच्या आधारावर देशाचे राजकारण आणि शिक्षण आधारलेले असताना महाराजांच्या विचाराने देशाची वाटचाल होणे आवश्यक आहे. त्यांच्या कार्याचा आणि कोल्हापूरचा वारसा भारतभर पोहोचावा.यावेळी महापौर सरिता मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. उपमहापौर भूपाल शेटे म्हणाले, शाहू महाराजांनी ५५० एकर जागा कुष्ठरोग्यांसाठी दिली. ही जागा धनदांडग्यांनी बळकावण्याचा प्रयत्न झाला. मात्र आम्ही तो हाणून पाडला. आता नर्सरी बागेतील शाहूराजांच्या समाधिस्थळासाठी शासनाने दमडीची मदत केली नाही. महापालिकेने आतापर्यंत तीन कोटी रुपये खर्च केले असून, सात कोटी रुपयांच्या निधीतून येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे समाधिस्थळ होईल.अ‍ॅड. शशिकांत सचान म्हणाले, कानपूर महाविद्यालयाला शाहूंचे नाव देण्यात आले आहे. हे महाविद्यालय नेत्रदीपक प्रगती करीत आहे. मात्र कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याबद्दल इतिहासकारांनी फार लिहिले नाही, याचा खेद आहे. अध्यक्षीय भाषणात शाहू छत्रपती यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वापर भाषणांपुरता न करता प्रत्येकाने ते आचरणात आणले पाहिजेत. जातीच्या राजकारणावरून समाजात फूट पडत असताना सर्वांनी एकोपा राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.यावेळी व्यंकाप्पा भोसले, प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील, माजी महापौर भिकशेट पाटील, सतीश रणदिवे, डॉ. पद्मा पाटील, गंगाराम कांबळे कुटुंबीय यांना राजर्षी शाहू सन्मान देऊन गौरविण्यात आले. तसेच शाहू महाराजांनी स्थापन केलेली वसतिगृहे, संस्था, संशोधन केंद्रे या संस्थांचा राजर्षी शाहू सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. इंद्रजित सावंत यांनी परिषदेची रूपरेषा सांगितली. बबन रानगे यांनी स्वागत केले. निमंत्रक वसंत मुळीक यांनी प्रास्ताविक केले. प्रा. पद्मा पाटील यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.

 

 

टॅग्स :Shahu Maharaj Jayantiशाहू महाराज जयंतीkolhapurकोल्हापूर