शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
5
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
6
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
7
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
8
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
9
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
10
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
11
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
13
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
14
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
15
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
16
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
17
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
18
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
19
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
20
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

अनंत झेंडे यांना ‘माउली आनंदी’ पुरस्कार, विश्वनाथ महाराज रुकडीकर शताब्दी पुण्यस्मरण सोहळा मंगळवारपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 11:09 AM

श्री सद्गुरू दादा महाराज सांगवडेकर सेवा प्रतिष्ठानतर्फे ३० जानेवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत परमपूज्य श्री सद्गुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर यांच्या शताब्दी पुण्यस्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संगीताआक्का सांगवडेकर व रामराया सांगवडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी श्रीगोंदा (जि. अहमदनगर) येथील महामानव बाबा आमटे सेवा संस्थेचे संचालक अनंत झेंडे यांना यावर्षीच्या ‘माउली आनंदी पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

ठळक मुद्देअनंत झेंडे यांना ‘माउली आनंदी’ पुरस्कार : सांगवडेकर विश्वनाथ महाराज रुकडीकर शताब्दी पुण्यस्मरण सोहळा मंगळवारपासून

कोल्हापूर : श्री सद्गुरू दादा महाराज सांगवडेकर सेवा प्रतिष्ठानतर्फे ३० जानेवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत परमपूज्य श्री सद्गुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर यांच्या शताब्दी पुण्यस्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संगीताआक्का सांगवडेकर व रामराया सांगवडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी श्रीगोंदा (जि. अहमदनगर) येथील महामानव बाबा आमटे सेवा संस्थेचे संचालक अनंत झेंडे यांना यावर्षीच्या ‘माउली आनंदी पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.या सोहळ्याची सुरुवात बुधवारी (दि. ३०) सकाळी आठ वाजता श्री सद्गुरू विश्वनाथ महाराज पालखी सोहळ्याने होणार आहे. मिरजकर तिकटीच्या विठ्ठल मंदिर येथून शोभायात्रेस सुरुवात होईल. महाद्वार रोडमार्गे सद्गुरूंच्या पादुका अंबाबाई मंदिरात देवीच्या दर्शनासाठी जातील. नंतर त्या भवानी मंडपमार्गे विश्वपंढरी येथे येतील. यानंतर शंकराचार्य श्री विद्यानृसिंह भारती यांचे आशीर्वचन होईल. तसेच रोज सकाळी व सायंकाळी श्री ज्ञानेश्वरी पारायण, मान्यवरांची प्रवचने, कीर्तन होणार आहे.अनंत झेंडे यांना ५ फेब्रुवारीला सायंकाळी सव्वासहा वाजता माउली आनंदी पुरस्काराचे वितरण होईल. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व ज्ञानेश्वरीची प्रत असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. झेंडे यांनी २००८ साली बाबा आमटे, साधनाताई आमटे व डॉ. गिरीश कुलकर्णी यांच्याकडून प्रेरणा घेऊन विद्यार्थी सहायक समितीची स्थापना केली.

या संस्थेद्वारे साधना बाल भवन, आरंभ बालनिकेतन, जनजागृती व्याख्यानमाला, स्वातंत्र्यसेनानी रामलाल मेहता ग्रंथालय, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम स्टडी सेंटर असे सामाजिक उपक्रम राबविले जातात. तरी नागरिकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. परिषदेस आनंदनाथ महाराज, विलास सावंत, आदी उपस्थित होते.

महाआरोग्य शिबिरया पुण्यस्मरण सोहळ्यांतर्गत १० दिवस महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात पुण्यातील वैद्य समीर जमदग्नी व त्यांचे सहकारी रुग्णांची तपासणी व उपचार करणार आहेत. तसेच लहान मुलांसाठी विश्वप्रणाली संस्कार शिबिर होणार आहे. 

 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमkolhapurकोल्हापूर