गारगोटी : भुदरगड किल्ल्यावर बुद्धकालीन गुहा सापडली असून अभ्यासक डॉ. सुभाष देसाई यांनी ती शोधून काढली आहे. महाराष्ट्राच्या दक्षिण पश्चिम भागातील भुदरगड किल्ला हा आदिलशहाच्या ताब्यात होता असा इतिहास आजपर्यंत माहीत होता. परंतु आता या डोंगराची ओळख दोन हजार वर्षांपूर्वीची असल्याचे बुद्धकालीन गुंफा आणि चैत्य सापडल्यामुळे निर्माण झाली आहे.त्यांनी "महायोगी गौतम बुद्ध" हे इंग्रजी व मराठीतील ग्रंथ लिहिले असून कोल्हापुरातील गौतम बुद्धांच्या पवित्र अस्थी नि रक्षेचा करंडा असलेला स्तूप होता ती जागा शोधण्याचे महत्त्वपूर्ण संशोधन यापूर्वी केले आहे. भारतातील "आर्किटेक्चर" प्राचीनकाळी बुद्ध आणि जैन साधू जेव्हा या गुहेत राहत होते तेव्हापासून सुरू झाले. चैत्यही त्यांची प्रार्थनास्थळे तर गुहा हे विहार असत. ख्रिस्त पूर्वकाळात पश्चिम भारतात अशा वास्तू पहाडात कोरल्या गेल्या. प्रारंभी कमी संख्येने असणारे बुद्ध व जैन साधू नैसर्गिक गुहेत राहत असत. कालांतराने अनुयायांची संख्या वाढल्यावर गुहा कोरल्या.आंध्र प्रदेशातील बुद्ध स्मारकांचा शोध घेताना डॉ. आ. ह. साळुंखे त्यांच्याबरोबर होते. बिहार, ओरिसा, नेपाळ भागात ते फिरले. सर्वत्र बुद्ध धर्माची प्रसार प्रसाद चिन्हे त्यांना आढळले. गुंफेतील वास्तुशास्त्रावर बुद्धविचारांचा प्रभाव सर्वाधिक आढळतो. कारला भाजी कान्हेरी अजंठा बीडची गुंफा प्रसिद्ध आहेत. आता यात एका नव्या गुहा आणि स्तुपाची भर पडली ती म्हणजे भुदरगड किल्ल्याची.किल्ल्यावरील रचनासध्या भुदरगड किल्ल्यावरील भैरव मंदिर यातील आतील रचना पाहिली तर ती चैत्य होते असे दिसते तर जखीनपेठच्या बाजूला तटाखाली काही गुंफा असून एकवीस फूट बाय वीस फूट बाय वीस फूट आकाराच्या भव्य शिळेमध्ये गुंफा कोरलेली आहे. प्रवेशद्वार छोटे असून पूर्वाभिमुख आहे. पाठीमागच्या बाजूला दगडी पायऱ्या उतरण असून समोर दूरवर दरीचे रम्य दृश्य पसरले आहे. जवळ सपाट सुपीक जमीन व पाणी आहे. या दुर्गम भागात आज ही भातशेती केली जात आहे . बुद्ध भिख्खू अशा शेतीवर आपली उपजीविका प्राचीनकाळी करत असावेत.
कोल्हापुरातील भुदरगड किल्ल्यावर सापडले प्राचीन बुद्ध गुहा, चैत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 5:25 PM