सुहास जाधव --पेठवडगाव -‘त्या’ पती-पत्नीने आपले वैचारिक मतभेद विकोपाला चाललेत म्हणून न्यायालयात घटस्फोट, पोटगीसाठी अर्ज केला होता. यामध्ये न्यायाधीश उमेशचंद्र शिंदे यांनी मध्यस्थी केली. दोन वर्षांपासून विभक्त राहिलेला संसार उभा राहिला आणि मोडता... मोडता... एक संसार वाचला.येथील दिवाणी न्यायालयात हातकणंगले तालुक्यातील एका महिलेने पती संशयावरून शारीरिक, मानसिक छळ करतो म्हणून कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ च्या १२ व्या कलमाखाली अर्ज दाखल केला. त्यानुसार संरक्षक आदेश व पोटगीसाठी अर्ज दाखल केला. त्यांचा एक मुलगा दहावीला आहे. दोघांच्या वादात मुलाची ताटातूट झाली होती. सहदिवाणी न्यायाधीश एम. आर. सोनी यांनी त्यांना तडजोडीसाठी मध्यस्थ म्हणून दिवाणी न्यायाधीश उमेशचंद्र मोरे यांच्याकडे पाठविले. त्यांनी मध्यस्थी केल्यास श्रम, शक्ती, पैसा, वेळ वाचतो. तसेच दोघांचा फायदा होतो हे त्या जोडप्याला पटवून दिले. यामुळे दोघांनी स्वखुषीने न्यायालयात तडजोड केली. येथून थेट पत्नी नांदण्यास गेली आणि एक संसार मोडता मोडता वाचला!
अन्... ‘ब्रेक के बाद’ संसार
By admin | Published: October 22, 2015 12:33 AM