मुरगूड : संपूर्ण शहर स्वच्छ राहावे, यासाठी सूर्याचे कवडसे पसरण्यापूर्वीच गल्लोगल्ली, दारोदारी फिरून गटारी साफ करणारे, कचरा उचलणारे स्वच्छतादूत नेहमीच दुर्लक्षित राहतात; पण मुरगूडमध्ये चक्क गाडगेबाबांच्या वेशातच आलेल्या व्याख्यात्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान झाला. मुरगूड येथील वनश्री रोपवाटिकेच्यावतीने आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य पी. डी. मगदूम होते. यावेळी प्रा. डॉ. नवनाथ शिंदे यांनी संत गाडगेबाबा यांच्या वेशभूषेत येऊन ‘कर्मयोगी संत गाडगेबाबा’ हा एकपात्री प्रयोग सादर केला. यावेळी देवाप्पा नारायण कांबळे, सुखदेव नारायण कांबळे, शेवंता कांबळे, आक्काताई कांबळे, मारुती कांबळे, आदींचा सत्कार झाला. जी. व्ही. चौगले, प्राचार्य महादेव कानवडेकर, पी. व्ही. पाटील, एम. टी. सामंत, शिवप्रसाद बोरगावे, जयवंत हावळ, नीता सूर्यवंशी उपस्थित होते. प्रवीण सूर्यवंशी यांनी स्वागत व आभार मानले. (प्रतिनिधी)
...अन् मुरगूडमध्ये गाडगेबाबाच अवतरले !
By admin | Published: December 30, 2014 9:22 PM