शिरोळ : शिरोळ तालुक्यात मंगळवारी दुसऱ्या दिवशीही आंदोलन अंकुशने ऊसतोडी बंद पाडल्या. अर्जुनवाड, चिंचवाड, शिरटी, नांदणी, टाकवडे, दत्तवाड याठिकाणी पंचगंगा, जवाहर, शरद कारखान्याच्या तोडी बंद करण्यात आल्या. जोपर्यंत परवडणारा दर मिळत नाही तोपर्यंत शेतकºयांनी तोडी घेवू नयेत असे आवाहन अंकुशच्यावतीने करण्यात आले.आंदोलन अंकुश या संघटनेने शिरोळ येथे नुकतीच एल्गार परिषद घेवून गत हंगामातील अंतिम बिल दोनशे रुपये तर यंदाच्या हंगामील पहिली उचल ३७०० रुपये एकरकमी दिल्याशिवाय कोयता चालू देणार नाही, असा इशारा दिला होता. त्यानंतरही सोमवारी शिरढोण येथे जवाहर साखर कारखान्याकडून ऊसतोड सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी ऊसतोड रोखली.त्यानंतर मंगळवारी दुसऱ्या दिवशीही अर्जुनवाड, चिंचवाड, नांदणी, टाकवडे याठिकाणी ऊसतोडी सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांच्यासह कार्यकर्त्यांनी ऊसतोडी बंद पाडल्या. परवडणारा दर मिळाल्याशिवाय शेतकºयांनी तोडी घेवू नयेत, असे आवाहन करण्यात आले.
Kolhapur: आंदोलन अंकुशने शिरोळ तालुक्यात दुसऱ्या दिवशीही ऊसतोडी बंद पाडल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 12:14 PM