शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
2
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
3
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : येवल्यातील गावात भुजबळांना मतदान केंद्रावर जाताना अडवले; शाब्दीक चकमक
4
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
6
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
7
VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध...
8
जीवघेणं रॅगिंग! सीनियर्सनी अनेक तास उभं राहण्याची दिली शिक्षा; विद्यार्थ्याचा झाला मृत्यू
9
घसरणीचा झुनझुनवाला कुटुंबालाही फटका; २ महिन्यात १५००० कोटी गमावले; हा शेअर सर्वात जास्त पडला
10
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
11
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
12
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
13
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
14
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
15
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
16
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
17
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
18
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
19
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
20
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'

रणरणत्या उन्हात अंगणवाडी सेविकांचा कोल्हापुरात तावडे हॉटेल चौकात रास्ता रोको

By भीमगोंड देसाई | Published: January 23, 2024 3:51 PM

१०० सेविकांना पोलिसांनी ताब्यात घेतले, उद्यापासून पालकमंत्र्यांसह सत्ताधाऱ्यांच्या घरासमोर आंदोलन

कोल्हापूर : अंगणवाडी सेविकांना दर महिना २६ हजार रुपये व मदतनीसांना २० हजार रूपये वेतन द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी दीड महिन्यांहून अधिक काळ संप करूनही सरकार गंभीर नसल्याने मंगळवारी जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली येथील तावडे हॉटेल चौकात रस्ता रोको आंदोलन केले. रणरणत्या उन्हात सेविका मोठ्या संख्येने तब्बल एक तास रस्त्यावर ठिय्या मारल्याने राष्ट्रीय महामार्ग आणि गांधीनगरहून येणारी आणि जाणारी वाहतूक थांबली. महामार्गावरआंदोलन करण्यासाठी जाणाऱ्या सुमारे १०० सेविकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर आक्रमक सेविकांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करीत चौकातील सर्व रस्ते रोखून त्यांनी रोखले. तासाभरानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून रस्ता खुला केला.दरम्यान, सरकार मागण्यांकडे दूर्लक्ष करीत असल्याने आज, बुधवारपासून पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासह सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्याची घोषणा, यावेळी संघाचे अतुल दिघे यांनी जाहीर केले.महामार्ग रोको आंदोलनासाठी जिल्ह्यातील कानाकोपऱ्यांतून सेविका, मदतनीस सकाळी दहापासूनच तावडे हॉटेल चौकात येत राहिल्या. दुपारी बारा वाजता हायवे रोखण्यासाठी सेविका जावू लागल्या. त्यावेळी पोलिसांनी त्यांना मज्जाव केला. यामुळे आक्रमक सेविका, मदतनीसनी चौकात ठिय्या मारला. सर्व रस्ते बंद केल्याने वाहनांच्या लांब रांगा लागल्या. कडाक्याचे उन डोक्यावर झेलत त्यांनी रस्ता रोखला. पोलिसांनी थोडा बळाचा वापर करून रस्ता खुला केला. त्यानंतर आंदोलन स्थगित केले. आंदोलनात धोडींबा कुंभार, छाया तिप्पट यांच्यासह सेविका, मदतनीस मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गagitationआंदोलन