गडहिंग्लज : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यात केंद्र व राज्यातील भाजप सरकार अपयशी ठरल्याचा आरोप जनता दलातर्फे करण्यात आला. वाढत्या इंधन किंमतीमुळे सर्वसामान्यांना वाहने चालवणे आवाक्याबाहेर जात आहे. परिमाणी ढकल गाड्यात मोटारसायकल आणि रिक्षा ढकलत फिरवून इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला. शहरातील बसस्थानकासमोरील दसरा चौकात शासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने करण्यात आली.माजी आमदार अॅड. श्रीपतराव श्ािंदे म्हणाले, ‘जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीसह इंधन दरवाढ आटोक्यात ठेवण्यात सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे जिकीरीचे झाले आहे. इंधन दरवाढ रद्द न झालेस तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.’तालुकाध्यक्ष बाळेश नाईक म्हणाले, ‘वाढती महागाई व शेतकऱ्यांची कर्जमाफी यासह तालुक्यातील रस्ते, पाणी, बेघरांना घरे, देवदासींच्या प्रलंबित मागण्या इत्यादी प्रश्नांवर जनता दलाने सातत्याने संघर्षाची भूमिका घेतली आहे. इंधनाची दरवाढी ही सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारी आहे. सरकार लोकांना लुटून स्वत:ची तुंबडी भरत आहे.आंदोलनात, बड्याचीवाडीचे सरपंच सतीश कोळेकर, माजी नगराध्यक्ष राजेंद्र मांडेकर, नगरसेवक नरेंद्र भद्रापूर, दत्ता मगदूम, शशीकांत चोथे, उदय कदम, रमेश मगदूम, रमेश पाटील, अनिल कुंभार, गणपती खोत, बाबूराव धबाले, सुनीता दळवी, सागर पाटील, नगरसेविका वीणा कापसे, क्रांती शिवणे, आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.स्पर्र्धात्मक आंदोलनाचे आयोजनचंदूर (ता. हातकणंगले) येथे पेट्रोल दरवाढीच्या विरोधात स्पर्धात्मक आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. चारचाकी गाडी ढकलण्याची ही स्पर्धा आज, सोमवारी ग्रामपंचायतीसमोर आयोजित केली आहे. आंदोलनामध्ये चार व्यक्तींच्या संघाने सहभागी व्हावयाचे असून, त्यांनी १५० मीटर चारचाकी गाडी ढकलण्याची आहे. सर्वांत कमी वेळेत फज्जा पार करणाºया विजेत्या संघाला अनुक्रमे १५ लिटर, १० लिटर व ५ लिटर पेट्रोल बक्षीस देण्यात येणार आहे, अशी घोषणा राहुल आवाडे युवा सेनेच्यावतीने करण्यात आली आहे.
इंधन दरवाढीविरोधात संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:08 AM