कोल्हापूर : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी सातत्याने गेले तीन -चार दिवस होणाऱ्या बैठका आणि कामाचा अतिरिक्त ताण क्षीरसागर यांना जाणवत होता.काल, गुरुवारी मध्यरात्री त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर त्यांच्यावर अँजिओग्राफी तपासणी करण्यात आली. यामध्ये एक शीर ब्लॉकेज असल्याचे निदान झाले. त्यामुळे तात्काळ अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली.सद्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी स्वत: संपर्क साधून क्षीरसागर यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली. यासह शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, परिवहन मंत्री आमदर दिवाकर रावते यांनीही संपर्क साधून त्यांचा प्रकृतीची विचारपूस केली.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 12:22 PM