शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

संतप्त प्रवाशांनी नोकरदारांची रेल्वेगाडी रोखली -: कमी डब्यांची गाडी आल्याने प्रवासी संतापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:59 AM

‘नोकरदारांची गाडी’ म्हणून परिचित असलेली ही रेल्वेगाडी गेले सहा महिने अवेळी धावत असून, कधी बारा डब्यांची, तर कधी आठ व दहा डब्यांची येत असल्याने या गाडीस प्रचंड गर्दी होत आहे.

ठळक मुद्दे जयसिंगपूर, रुकडी येथे पडसाद

जयसिंगपूर / रुकडी : जयसिंगपूर आणि रुकडी येथे मंगळवारी सकाळी प्रवाशांनी रेल्वे रोखली. लोकल रेल्वेला डबे कमी असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. जवळपास पन्नास टक्के प्रवाशांना नव्या लोकल रेल्वेचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाकडे मागणी करुनही जादा डबे जोडले जात नसल्यामुळे प्रवाशांचा हा उद्रेक पाहायला मिळाला.सातारा-कोल्हापूर (पॅसेंजर नं. ५१४४१) ही रेल्वे गाडी रुकडी येथे मंगळवारी सकाळी ९.४५ वाजता संतप्त प्रवाशांनी अडविली. ‘नोकरदारांची गाडी’ म्हणून परिचित असलेली ही रेल्वेगाडी गेले सहा महिने अवेळी धावत असून, कधी बारा डब्यांची, तर कधी आठ व दहा डब्यांची येत असल्याने या गाडीस प्रचंड गर्दी होत आहे.

या गर्दीमुळे प्रवाशाचे प्रचंड हाल होत आहेत. याबाबत वारंवार तक्रार करूनही रेल्वे प्रशासन यावर निर्णय घेत नव्हते. सोमवारी सकाळी याच गाडीमध्ये गांधीनगर ते जयसिंगपूर दरम्यान गर्दीमुळे एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याने व एक बालिका अत्यवस्थ झाल्याने प्रवासी संतप्त होते.त्यातच मंगळवारी सकाळची सातारा-कोल्हापूर पॅसेंजर गाडीही कमी डब्यांची आल्याने प्रवासी संतप्त झाले. गाडीत प्रचंड गर्दी असल्याने अनेक स्थानकांवर प्रवाशांना गाडीत चढता आले नाही. त्यामुळे प्रवाशांच्यात संतप्त भावना निर्माण झाली. रुकडी येथे तर संतप्त प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवरच थांबून ट्रॅक अडविल्यामुळे रेल्वेगाडी स्थानकापासून अर्धा किलोमीटरवर थांबविण्यात आली.

याठिकाणी प्रवाशांना हटविण्याकरिता रेल्वे पोलिसांची कुमक मागविण्यात आली होती. प्रवाशांची समजूत काढण्याकरिता रेल्वेचे अधिकारी गेले असता प्रवाशांनी त्याना धारेवर धरत आक्रमक प्रश्न विचारले. यामुळे त्यांनी तेथून काढता पाय घेतला.रुकडी येथे रेल्वेगाडी पंधरा मिनिटे रेल्वेस्थानकाबाहेर उभी राहताच स्टेशन मॅनेजरांचा गोंधळ उडाला. त्यानी रेल्वे प्रशासनाला या गोष्टीची माहिती देताच गाडी स्थानकाच्या आत घेण्याच्या सूचना मिळाल्या. रेल्वे ट्रॅकवर प्रवासी थांबलेल्या ठिकाणी डेप्युटी स्टेशन मॅनेजर पंकजकुमार चौधरी यांनी जाऊन प्रवाशांची समजूत काढली. त्यांनी दोन दिवसांत या गाडीला जादा डबे जोडण्याची विनंती रेल्वे प्रशासनाला करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

यानंतर ट्रॅकवरून प्रवासी बाजूला झाले. तत्पूर्वी सकाळी मिरजहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या या रेल्वेत प्रवाशांना बसण्यासाठी जागा नसल्याने व रेल्वेला फक्त सहाच डबे असल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांनी जयसिंगपूर येथे थेट रेल्वे इंजिनसमोर उभा राहून निदर्शने सुरू केली. जवळपास पंधरा मिनिटे रेल्वे थांबविण्यात आली होती. त्यानंतर मोठा गोंधळ सुरू झाला. यावेळी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ प्रशासनाकडे मागणी कळविण्याचे आश्वासन दिल्यानंतर रेल्वे सोडण्यात आली.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSangliसांगलीrailwayरेल्वे