शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

'सुमंगल'साठी खर्च, कारवाईसाठी शासन सतर्क?; प्रशासनाविरोधात संताप 

By समीर देशपांडे | Published: January 18, 2024 4:14 PM

ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांच्या संतप्त भावना

समीर देशपांडेकोल्हापूर : गोकुळ शिरगावचे ग्रामविकास अधिकारी मुजीब शेख यांचे झालेले निलंबन, अस्लम नबीसो जमादार आणि अजय वाघ यांची होणारी चौकशी असो. एकूणच या प्रकाराविरोधात ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. शासनाच्या विविध कार्यक्रमांवेळी आम्हाला वरिष्ठ अधिकारी खर्च करायला लावतात आणि तपासणीत त्रुटी आढळल्या की कारवाई कशी करता, असा सवाल आता विचारला जात आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या पथकाने गोकुळ शिरगावच्या ग्रामपंचायतीची तपासणी केली होती. त्यामध्ये अनेक त्रुटी आढळल्या. सुमारे ७०० बिलांचे बेकायदेशीरपणे ५० लाख रुपये रोखीने अदा केल्याचा ठपका ठेवण्यात आला. याच कारणावरून आधीच्या दोन्ही ग्रामविकास अधिकाऱ्यांचीही चौकशीही होणार आहे. परंतु यातील अधिकाधिक खर्च हा कणेरी मठावर आयोजित ‘सुमंगल महोत्सवा’वेळचा असल्याने त्यावेळी काहीही करा; परंतु ही कामे झाली पाहिजे, असे सांगणारे वरिष्ठ अधिकारी आता आमची बाजू का घेत नाहीत, असा सवाल उपस्थित केला जात आहे.कणेरी मठावरील महोत्सवावेळी मठावर जाण्यासाठी गोकुळ शिरगावमधूनच प्रमुख रस्ता जातो. या ठिकाणी स्वागत कमानी करण्यापासून माहिती कक्ष उभारण्यापर्यंत अनेक सोयीसुविधा उभारण्यात आल्या होत्या. या सगळ्याचा खर्च याच ग्रामपंचायतीमधून करण्यात आला आहे. त्यावेळी केंद्र आणि राज्य पातळीवरून मंत्री आणि अधिकारी येत होते आणि सूचना देत होते. सोयीसुविधा करायला लावत होते. जिल्हा परिषदेचे अधिकारीही हे उद्याच्या उद्या झाले पाहिजे अशा सूचना देत हाेते. 

तर 'हे' ग्रामसेवकही निलंबित कंदलगावला राज्यपाल येणार म्हणून २२ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. या कार्यक्रमासाठी तातडीने मंडप उभारण्यापासून अनेक गोष्टी करण्यात आल्या. अतिशय कमी वेळात या व्यवस्था उभारायच्या असल्याने साहजिकच अशावेळी रोख पैसे दिल्याशिवाय कोणीही सेवा द्यायला येत नाही. त्यामुळे रोखीने खर्च केला जातो. हीच परिस्थिती शिंगणापूर येथील आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार या येऊन गेल्या. तिथेही मोठा खर्च झाला. या दोन्ही ठिकाणी आता तपासणी केली तर तिथले ग्रामसेवकही निलंबित करावे लागतील. जे अधिकारी उद्याच्या उद्या काम झाले पाहिजे म्हणतात तेही जबाबदारी का घेत नाहीत, अशी विचारणा होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर