सावरवाडी : बहिरेश्वर (ता. करवीर) येथे पशुवैद्यकीय दवाखान्याअंतर्गत कामधेनू दत्तक ग्राम योजनेअंतर्गत जनावरांचे जंतनिर्मुलन तपासणी शिबिर घेण्यात आले.
जिल्हा परिषदेचे सदस्य सुभाष सातपुते यांचे हस्ते जातीवंत खिलार जातीच्या गायीचे पूजन करून शिबिरास प्रारंभ करण्यात आला.
शिबिरप्रसंगी गावातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जनावरांना खनिज मिश्रण, टाॅनिक, गोमाशी औषध, जंतनिर्मूलन तपासणी, गर्भतपासणी, कृत्रिम रेतन, आजारी जनावरांना औषध देण्यात आले.
यावेळी सरपंच युवराज दिंडे, रघुनाथ वरूटे, दत्ता दिंडे,उपस्थित होते तसेच या शिबिरास गावातील दूध उत्पादक, पशुपालक तसेच डाॅ. वाघमोडे, डाॅ. वैभव पाटील, डाॅ. प्रकाश दिंडे आदींचे सहकार्य लाभले.