मुख्याधिकारी अजिंक्य पाटील यांनी स्वागत केले. उपनगराध्यक्षपदासाठी केसरकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी यांनी जाहीर केले.
केसरकर यांचे नाव विलास नाईक यांनी सुचविले. त्यास संजीवनी सावंत यांनी अनुमोदन दिले.
नूतन उपनगराध्यक्ष केसरकर यांचा नगराध्यक्षांच्या हस्ते सत्कार झाला. अशोक चराटी यांनी माझ्यावर विश्वास दाखविला आहे. या संधीचे सोने करीत आजरा पाणी योजना मंजुरीचे काम पूर्णत्वाला नेणार आहे, असे सत्काराला उत्तर देताना उपनगराध्यक्ष केसरकर यांनी सांगितले.
आजरा शहराला मिळणारा विकास निधी यापुढे ज्या प्रभागात कामे झाली नाहीत, त्याठिकाणी दिला जाणार आहे. शहरातील गटारीचे व पाणी योजना मंजुरीसाठी प्रयत्नशील आहे. विकासकामात कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, असे ज्येष्ठ नगरसेवक अशोक चराटी यांनी सांगितले.
या वेळी नगरसेवक किरण कांबळे, आनंदराव कुंभार, आलम नाईकवाडे, अस्मिता जाधव, सुमैय्या खेडेकर, शकुंतला सलामवाडे यांसह सर्व नगरसेवक उपस्थित होते.
फोटो : अनिरुद्ध केसरकर : २९०६२०२१-गड-०१