शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"
2
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
3
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
4
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
5
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
6
सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा
8
जिद्दीला सलाम! १ कोटीची नोकरी सोडून सुरू केली कंपनी; तरुणांसाठी करतेय मोठं काम
9
शायना एनसींना इम्पोर्टेड माल म्हटल्याबद्दल अरविंद सावतांनी मागितली माफी; म्हणाले, "जाणूनबुजून मला..."
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सांगलीत महायुतीला मोठा दिलासा! सम्राट महाडिकांचा यू-टर्न, अपक्ष अर्ज माघार घेणार; सत्यजीत देशमुखांचा प्रचार करणार
11
खानयारमध्ये चकमक सुरूच; दहशतवादी लपलेल्या घराला स्फोटानंतर लागली भीषण आग
12
Bad Luck! कोहलीच्या बॅटनं खेळण्याची हुक्की; Akash Deep वर ओढावली Diamond Duck ची नामुष्की!
13
कॅनडाचे जस्टीन ट्रुडो सरकार सुधरेना! भारताचा 'सायबर धोकादायक' देशांच्या यादीत केला समावेश
14
निवडणूक आयोगाची भलतीच डोकेदुखी; एका मतदारसंघात प्रत्येक बुथवर लावावी लागणार ९ EVM
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: "मी जे काही काम करतो ते पक्ष हितासाठी करतो", निवडणूक लढवण्यावर गोपाळ शेट्टी ठाम
16
एकच आमदार असणाऱ्यांविषयी...; राज ठाकरेंच्या टीकेनंतर शरद पवारांकडून खरपूस समाचार!
17
विना गॅरेंटी इतक्या कमी व्याजावर मिळेल ३ लाखांपर्यंतचं कर्ज; पाहा काय सरकारची PM Vishwakarma योजना
18
दिवाळी संपताच सुरू होणार राजकीय दिवाळी; मनधरणीसाठी अनेकांनी केली दिल्ली वारी
19
Shubman Gill ची सेंच्युरी हुकली; पण पुजाराला ओव्हरटेक करत साधला मोठा डाव
20
Girish Mahajan : संकटमोचकाने घेतली नाशिकमधील नाराजांची भेट; आहेर, भुजबळांच्या बंडखोरीचे आव्हान

अंजली निगवेकर शिवाजी विद्यापीठाच्या पहिल्या दिव्यांग विभागप्रमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 7:08 PM

शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या प्रमुखपदी डॉ. अंजली निगवेकर यांची नियुक्ती झाली आहे. डॉ. निगवेकर या दृष्टी दिव्यांग असूनही त्यांनी संगीत विशेषत: गायन अध्यापनात स्वत:चा ठसा उमटविला आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर त्यांनी कुलगुरू डॉ. शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. कुलगुरूंनी ग्रंथभेट देऊन त्यांचे अभिनंदन केले.

ठळक मुद्देअंजली निगवेकर शिवाजी विद्यापीठाच्या पहिल्या दिव्यांग विभागप्रमुख‘संगीतशास्त्रा’ची जबाबदारी; कुलगुरूंकडून अभिनंदन

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या प्रमुखपदी डॉ. अंजली निगवेकर यांची नियुक्ती झाली आहे. डॉ. निगवेकर या दृष्टी दिव्यांग असूनही त्यांनी संगीत विशेषत: गायन अध्यापनात स्वत:चा ठसा उमटविला आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर त्यांनी कुलगुरू डॉ. शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. कुलगुरूंनी ग्रंथभेट देऊन त्यांचे अभिनंदन केले.यावेळी कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, विविध गायन कलाप्रकारांत निष्णात असलेल्या डॉ. अंजली निगवेकर यांच्या अनुभवाचा लाभ संगीतशास्त्र अधिविभागाला निश्चितपणे होईल. विद्यापीठ प्रशासनाचे त्यांना सर्वतोपरी सहकार्य राहील. आपल्या दिव्यांगत्वाची कोणतीही सबब पुढे न करता गेली सुमारे २८ वर्षे डॉ. निगवेकर विद्यापीठात अध्यापन कार्य करीत आहेत, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

अधिविभाग प्रमुखपदाची जबाबदारीही त्या तितक्याच समर्थपणे सांभाळतील. या कार्यक्रमास प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी. आर. मोरे, संगीतशास्त्र अधिविभागातील शिक्षक निखिल भगत, डॉ. विनोद ठाकूरदेसाई आणि सुप्रिया टिपुगडे, आदी उपस्थित होते.

२८ वर्षे अध्यापनाचे कार्यडॉ. निगवेकर या १९८६ मध्ये संगीतशास्त्र अधिविभागात विद्यार्थिनी म्हणून प्रवेशित झालेल्या होत्या. त्यानंतर डॉ. भारती वैशंपायन यांच्या मार्गदर्शनाखाली संगीतशास्त्र विषयात पीएच.डी. केली असून, १९९१पासून शिवाजी विद्यापीठात गेली २८ वर्षे अध्यापनाचे कार्य करीत आहेत. विद्यार्थिनी ते अधिविभागप्रमुख असा त्यांचा येथील प्रवास आहे.

मी आजपर्यंत केलेल्या कार्याची पोचपावती विद्यापीठाने मला या नियुक्तीच्या माध्यमातून दिली आहे. ही नियुक्ती माझ्यासाठी आनंददायक आणि प्रोत्साहन देणारी आहे. माझ्यावरील जबाबदारी वाढली आहे. अधिविभाग आणि विद्यापीठाच्या प्रगतीसाठी मी कार्यरत राहीन.- डॉ. अंजली निगवेकर 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर