शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज ठाकरे आणि मी एकत्र आलो तर..."; स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजेंचं मोठं विधान
2
"पुरावे द्या नाहीतर गप्प बसा"; भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाच्या ट्रूडो सरकारला खडसावले!
3
IND vs NZ : "मला असा संघ हवाय जो एका दिवसात...", भारताचा 'हेड' गंभीरची 'मन की बात'
4
Nobel Prize for Economics: अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर, कोणाला मिळालं?
5
बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट; 'ते' सहा जण कोण? पुणे कनेक्शनही समोर
6
"नरेंद्र मोदींची ‘मेक इन इंडिया' योजना ठरली 'फेक इन इंडिया' ", काँग्रेसची बोचरी टीका     
7
बांगलादेश भारताविरोधात इंटरपोलकडे धाव घेणार, तर समुद्रात चीनसाठी घातल्या पायघड्या
8
SBI मध्ये मेगा भरती, अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस; पगार तब्बल 25.75 लाख रुपये...
9
Hot Hot Hot! मल्लिका शेरावतवर फिदा झाले गुणरत्न सदावर्ते, हातात हात घेतला, लाजले अन्...; व्हिडिओ व्हायरल
10
उद्धव ठाकरेंवर 'अँजिऑप्लास्टी'; ब्लॉकेज आढळल्यानं लगेचच शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला
11
वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकरचे वडील विधानसभेच्या रिंगणात?; भाजपकडून लढण्यास इच्छुक
12
जगातील 'या' देशांमध्ये मिळतंय स्वस्त सोनं; किंमत पाहून तुम्हीही म्हणाल...
13
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेतून स्टार खेळाडूची माघार
14
सलमान खान, सगुनप्रीत सिंह, कौशल चौधरी, कोण आहेत गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टार्गेटवर?
15
Paytm Share Price : 'या' शेअरनं ९० दिवसांत दिला ७१% रिटर्न, आता Mutual funds नं वाढवली गुंतवणूक 
16
Video: Elon Musk चा मोठा कारनामा; जगातील सर्वात मोठ्या रॉकेटची यशस्वी लँडिंग
17
“हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देऊ नका”; आता काँग्रेस आमदाराची मागणी, पण कारण काय?
18
आत्मविश्वासाची कमी अन् ऑस्ट्रेलियाची भीती; पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती
19
"समाजातील रावण...", दसऱ्याला अनोखं दहन; महिलेने जाळला नवरा, सासू-सासऱ्यांचा प्रतिकात्मक पुतळा
20
महायुतीच्या घोषणांना काँग्रेस जोरदार उत्तर देणार; महाराष्ट्रासाठी जाहीरनाम्यात ३ मोठी आश्वासने असणार?

अण्णा भाऊ साठे महामंडळ घोटाळ्यातील गाडी आजऱ्यात

By admin | Published: August 18, 2015 11:45 PM

कदम याच्या मेहरबानीने या लाभार्थ्याला हे कर्ज देण्यासाठी थेट कर्ज योजनेच्या अटींनाही बगल देण्यात आली. सात लाख कर्जमर्यादा असताना तब्बल बारा लाख पस्तीस हजारांचे कर्ज देण्यात आले

संदीप खवळे -कोल्हापूर  -लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळातील ३८५ कोटींच्या घोटाळ्यातील सुमारे पंधरा लाखांची आलिशान गाडी कोल्हापूर जिल्ह्णातील आजरा तालुक्यातील चव्हाणवाडी येथील लाभार्थ्याकडे आहे. या गाडीसाठी महामंडळाच्या थेट कर्ज योजनेतून बारा लाख पस्तीस हजार रुपयांचे कर्ज कागदपत्राशिवाय एका दिवसांत वितरित केले. थेट कर्ज योजनेची कमाल कर्जमर्यादा सात लाख असतानाही या व्यक्तीला १२ लाखांपेक्षा जास्त रकमेचा धनादेश देण्यात आला, अशी माहिती महामंडळाच्या अधिकृत सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.या लाभार्थांने मुंबईत राहणाऱ्या पाहुण्यांकडून महामंडळाचे अध्यक्ष रमेश कदम यांच्याकडे वशिला लावून ही आलिशान गाडी शिरोली (जि.कोल्हापूर) येथील एका नामांकित शोरूममधून २०१४ मध्ये खरेदी केली. खरेदीसाठी महामंडळाकडून १२ लाख पस्तीस हजार रुपयांचा धनादेश रातोरात देण्यात आला. थेट कर्ज योजनेच्या अटीनुसार भरावयाची पाच टक्के रक्कमही या लाभार्थ्याकडून भरून घेण्यात आली नाही. थेट कर्ज योजनेंतर्गत जास्तीत जास्त सात लाख रुपयांचे कर्ज देण्यात येते. कदम याच्या मेहरबानीने या लाभार्थ्याला हे कर्ज देण्यासाठी थेट कर्ज योजनेच्या अटींनाही बगल देण्यात आली. सात लाख कर्जमर्यादा असताना तब्बल बारा लाख पस्तीस हजारांचे कर्ज देण्यात आले. कागदपत्रांची शहानिशाही करण्यात आली नाही. घोटाळा बाहेर येताच त्यांने पाच टक्के रक्कम आणि कर्जाचे हप्ते भरण्यास सुरुवात केली.एकीकडे महामंडळात हजारो अर्ज प्रलंबित असताना, नियमबाह्य कर्जाचे वाटप झाल्यामुळे गरजूंची गोची झाली आहे. महामंडळाच्या कोल्हापूर जिल्हा कार्यालयात विविध योजनेसाठी मंजूर झालेले ३०० अर्ज निधीअभावी धूळ खात आहेत. अध्यक्षाच्या चुकीमुळे गरजू लाभार्थ्यांना फटका बसत आहे. प्रकरण बँकांनी मंजूर केले आहे, पण अनुदानासाठी निधी नसल्यामुळे लाभार्थी चिंतेत आहेत.