माध्यमिक विभागातून बाबासाहेब नदाफ, रामराव पाटील, किरण पाटील, कुबेर पाटील, विजय कुंभार, सुश्मिता शिंदे, सविता माने, अमित कांबळे, पोपट परीट, सचिन खोत, रवींद्र पाटील, नितीन पद्माई यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला. तर प्राथमिक विभागातून तानाजी माने, सुनीता जोशी, संपतराव कांबळे, दर्शन शिनगारे, शुभांगी स्वामी, दत्तात्रय गोडसे, गीता हालोंडे, भगवान बनकर, स्नेहलता शेटे, हिंमत नदाफ, रामचंद्र कांबळे, राजेंद्र भोसले, या शिक्षकाना पुरस्कार देण्यात येणार आहेत. आदर्श हायस्कूल म्हणून आळते हायस्कूल, आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल सावर्डे आणि आदर्श शाळा म्हणून विद्यामंदिर पाराशरनगर नवे पारगाव, कुमार विद्या मंदिर रेंदाळ व विद्यामंदिर संभाजीनगर सावर्डे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
फोटो - आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांना निवडीचे पत्र देताना जि. प. माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव, संजय चौगुले व मान्यवर.