शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

महाराष्ट्र शासनाची विशेष अभय योजना जाहीर

By admin | Published: October 28, 2014 10:41 PM

जिल्हा उद्योग केंद्राची माहिती : ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी : राज्याचा समतोल औद्योगिक विकास घडविण्यासाठी व आर्थिक विकास साधण्यासाठी आणि नवीन उद्योग घटकांच्या स्थापनेस चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने औद्योगिक धोरण २०१३ जाहीर केले आहे. या धोरणाचा एक भाग म्हणून पुनरूज्जीवनक्षम नसलेल्या तसेच बंद घटकांना सुलभ निर्गमन पर्याय (इझी एक्झिट आॅप्शन) उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विशेष अभय योजना जाहीर केली होती. या योजनेस ३१ मार्च २०१५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांनी दिली.या योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी एक वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी बंद असलेल्या किंवा न्यायालयाकडून नादार, दिवाळखोर म्हणून घोषित झालेला उद्योग घटक, रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या मार्गदर्शक सूत्रानुसार पुनरूज्जीवनक्षम नसलेला उद्योग घटक व उद्योग घटक हस्तांतरणामुळे घटकाच्या व्यवस्थापनात बदल होऊन घटक पुढे यशस्वीरित्या चालू राहील, आदी निकष लावण्यात आले आहेत.ही योजना शासकीय थकीत देण्यांसाठी लागू राहणार असून निमशासकीय संस्था, शासकीय कंपन्या व महामंडळे यांच्याकडील शासकीय थकीत देण्यांसाठीदेखील ही योजना लागू राहील. ज्या उद्योगास उत्पादन घटक उभारणीसाठी शासनाच्या अधिपत्याखालील महामंडळांकडून कर्ज देण्यात आलेले असेल त्या थकीत कर्जाच्या परतफेडीसाठी या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही. पात्र ठरणाऱ्या घटकाने राज्य शासनाची सर्व मुद्दलाची रक्कम एकरकमी भरल्यास व्याज व दंडव्याज माफ केले जाईल. वरील निकष पूर्ण करणाऱ्या व जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयास विविध कारणास्तव रक्कम देय असणाऱ्या उद्योगांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र, सिंधुदुर्ग कार्यालय, मुख्य प्रशासकीय इमारत, ए ब्लॉक, दुसरा मजला, मु. पो. सिंधुदुर्गनगरी, ता. कुडाळ येथे कामाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राने केले आहे. (प्रतिनिधी)