शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कोल्हापूर जिल्ह्यासाठी 16 हजार 40 कोटींचा वार्षिक पतपुरवठा आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 18:26 IST

Collcator Kolhapur : सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी अग्रणी जिल्हा बँकेच्यावतीने सुमारे 16 हजार 40 कोटी रूपयांचा वार्षिक पतपुरवठा आराखडा तयार करण्यात आला आहे. गेल्या वर्षी हा आराखडा 14 हजार 640 कोटी रूपयांचा होता. यामध्ये यंदा बँकेच्यावतीने तब्बल 1400 कोटी रूपयांची वाढ करण्यात आली आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यासाठी 16 हजार 40 कोटींचा वार्षिक पतपुरवठा आराखडादौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक

कोल्हापूर : सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी अग्रणी जिल्हा बँकेच्यावतीने सुमारे 16 हजार 40 कोटी रूपयांचा वार्षिक पतपुरवठा आराखडा तयार करण्यात आला आहे. गेल्या वर्षी हा आराखडा 14 हजार 640 कोटी रूपयांचा होता. यामध्ये यंदा बँकेच्यावतीने तब्बल 1400 कोटी रूपयांची वाढ करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहूजी सभागृहात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीला बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक हेमंत खेर, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक आशुतोष जाधव, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक माने, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. रवी  शिवदास, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे तर दूरदृश्यप्रणालीव्दारे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सहा. महाप्रबंधक मनोज मून यांनी सहभाग नोंदविला.प्रारंभी बँक ऑफ इंडियाचे अग्रणी जिल्हा प्रबंधक राहूल माने यांनी या वार्षिक पतपुरवठा आराखड्याची माहिती देताना सांगितले, यंदाच्या चालू आर्थिक वर्षामध्ये (सन 21-22) जिल्ह्यातील 100 टक्के शेतकरी बँकींग व्यवस्थेखाली आणण्यासाठी तसेच त्यांना लागणाऱ्या संलग्न सेवांसाठी सुमारे 4450 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. या रक्कमेपैकी कृषी क्षेत्रासाठी तब्बल 2720 कोटी रूपये पीक कर्जासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. यामध्ये 1360 कोटी पीक कर्जातंर्गत खरीप तर 1360 कोटी रूपये रब्बी हंगामासाठी देण्यात येणार आहेत. तर सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांसाठी 4240 कोटी आणि इतर प्राथमिक क्षेत्रासाठी 1520 कोटी असे तब्बल 10 हजार 210 कोटी रूपयांची प्राथमिक क्षेत्रासाठी तरतूद करण्यात आली आहे. तर उर्वरित रक्कम अप्राथमिक क्षेत्रासाठी राखून ठेवण्यात आली आहे.या बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी  देसाई म्हणाले, सन 21-22 या वर्षामध्ये प्रधानमंत्री जनधन योजना अंमलबजावणी, पी. एम. किसान लाभार्थ्यांना किसान क्रेडीट कार्ड देणे, नाबार्डच्या विविध अनुदान योजना राबविणे, प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंमलबजावणी आरसेटीव्दारा युवक प्रशिक्षणासाठी  सर्व बँकांना समाविष्ट करावे आणि एकूण कर्ज वाटपाच्या 15 टक्के इतकी रक्कम अल्पसंख्याकांना वाटप करण्यात यावा असा सहा कलमी कार्यक्रम बँकांनी राबवावा.

100 टक्के उद्दिष्टपूर्ती होण्यासाठी संबंधित बँकांनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त करून सेंट्रल बँक आणि बँक ऑफ बडोदाने त्यांची उद्दिष्टपूर्तता  केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले तर नाबार्डकडून सन 22-23 साठी संभाव्य कर्ज योजना बनविण्याचे काम सुरू असल्याची माहिती नाबार्डचे आशुतोष जाधव यांनी दिली.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते जिल्हा वार्षिक  पतपुरवठा  आराखडा (सन 2021-22) आणि आरसेटीच्या वार्षिक ॲक्टीव्हीटी अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश शेळके, आरसेटीच्या संचालिका सोनाली चतूर यांच्यासह सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक  दूरदृश्यप्रणालीव्दारे उपस्थित होते.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर