शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

साडेनऊ हजार कोटींचा वार्षिक पतपुरवठा

By admin | Published: April 12, 2017 1:19 AM

जिल्हाधिकारी : कृषी, बचत गटांची उत्पादन क्षमता वाढीसाठी प्रयत्न

कोल्हापूर : जिल्ह्यासाठी बँक आॅफ इंडिया या अग्रणी बँकेच्यावतीने सन २०१७-१८ या वर्षाकरिता ९ हजार ६२७ कोटींचा वार्षिक पतपुरवठा आराखडा तयार करण्यात आला असून, या आराखड्याचे प्रकाशन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या हस्ते करण्यात आले. या आराखड्यामध्ये कृषी व बचत गटांची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी यंदाच्या आराखड्यात १३ टक्क्यांनी वाढ करण्यात आली. जिल्हास्तरीय बँकर्स कमिटीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत वार्षिक पतपुरवठा आराखडा अग्रणी जिल्हा प्रबंधक एस. जी. किणिंगे यांनी सादर केला. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, बँक आॅफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक बी. के. आरसेकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण यांच्यासह सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्णासाठी तयार करण्यात आलेल्या ९ हजार ६२७ कोटींचा वार्षिक पतपुरवठा आराखड्यामध्ये प्राथमिकता क्षेत्रासाठी ६ हजार ८१० कोटी रुपयांची तरतूद केल्याचे यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी सांगितले. कृषी उत्पादनाला मिळणारे चांगले दर तसेच ८० टक्के शेतकरी बँकिंग व्यवस्थेखाली आणणे व त्याला लागणाऱ्या संलग्न सेवांसाठी २०१७-१८ या वर्षासाठी ३ हजार ४८० कोटी रुपयांची तरतूद केली तर यंत्रमाग तसेच इतर लघुउद्योगांसाठी २ हजार १४१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. इतर प्राथमिक क्षेत्रासाठी वाढ करून तब्बल १ हजार १८९ कोटी रुपयांची तरतूद केल्याचे यावेळी सांगण्यात आले.जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत ८१६५६८ खाती उघडण्यात आली असून त्यापैकी ग्रामीण भागामध्ये ५७८०४८ खाती तर शहरी भागामध्ये २३८५२० खाती उघडण्यात आली आहे. ४७५०२४ खातेधारकांना रूपे एटीएम कार्डाचे वाटप करण्यात आले. या वर्षापासून विविध विमा कंपन्यांच्या सहकार्याने बँका ग्रामीण भागात आरोग्य विमा सेवा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. यंदाच्या पतपुरवठा आराखड्याची अंमलबजावणी करताना सर्व बँकर्सनी शेतकरी, युवक, उद्योजक, बचतगट अशा व्यक्ती डोळ्यासमोर ठेवून नावीन्यपूर्ण योजना हाती घ्यावी, अशी सूचना करून जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, यावर्षी जिल्ह्यासाठी प्रधानमंत्री जन-धन योजनेची अंमलबजावणी करणे (विमा व मुद्रा कर्ज योजना / बँक मित्र), सोलर पंप सेट योजना, पीक विमा योजना राबविणे, आर-सेटीद्वारे १००० तरुण व तरुणींना प्रशिक्षण देऊन व्यवसाय उभारणी करणे, अल्पसंख्याकांना एकूण कर्जवाटपाच्या १५ टक्के कर्जवाटप करणे असा पाचकलमी कार्यक्रम राबविण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. अडीच लाख शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटपजिल्ह्यात आतापर्यंत ४५ हजार स्वयंसाहाय्यता बचत गट स्थापन करण्यात आले आहेत. २ लाख ५४ हजार ५३० शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना २ हजार ८३ कोटी ११ लाख रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. शेती, लघुउद्योग तसेच बचत गटांसाठी देण्यात येणारा कर्जपुरवठा मिळविण्यासाठी कर्जदारांनी बँकांकडे कर्जप्रकरण पाठविताना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी.