टेंभ्ये : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षाच्या तोंडी प्रात्यक्षिक व श्रेणी विषयांच्या परीक्षांचे वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले आहे. नियोजित वेळापत्रकाप्रमाणे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी या परीक्षा आयोजित कराव्यात, असे आवाहन कोकण विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव आर. बी. गिरी यांनी केले आहे. इयत्ता बारावी ची लेखी परीक्षा शनिवार २१ फेब्रुवारी रोजी सुरू होत आहे. या वर्गाची तोंडी, प्रात्यक्षिक व श्रेणी विषयाची परीक्षा सोमवार २ ते १८ फेब्रुवारीपर्यंत घेतली जाणार आहे. तर आऊट आॅफ टर्न विद्यार्थ्यांची परीक्षा ३० व ३१ मार्च या दिवशी होणार आहे. त्याचबरोबर यंदाची इयत्ता दहावीची लेखी परीक्षा मंगळवार ३ मार्च २०१५ पासून सुरू होत आहे. या वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान, आय. सी. टी. व अन्य विषयांची तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक व श्रेणी विषयाची परीक्षा ११ ते २८ फेब्रुवारी २०१५ दरम्यान घेतली जाणार आहे. आऊट आॅफ टर्न विद्यार्थ्यांची परीक्षा ३० व ३१ मार्च २०१५ या दिवशी घेण्यात येणार आहे. (वार्ताहर)परीक्षांचे काटेकोर आयोजन आवश्यकतोंडी, प्रात्यक्षिक व श्रेणी परीक्षाचे वेळापत्रक राज्यमंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे. सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी या परीक्षांचे आयोजन काटेकोरपणे करणे सक्तीचे आहे. तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा अथवा श्रेणी परीक्षेतून विद्यार्थ्यांचे वस्तूस्थितीदर्शक मूल्यमापन करणे सक्तीचे आहे. चुकीच्या पध्दतीने मूल्यमापन करणाऱ्या शाळा व शिक्षकांवर मंडळ नियमावलीप्रमाणे कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे या परीक्षांकडे शाळांनी व महाविद्यालयांनी गंभीरपणे पाहणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे यथार्थ परिक्षण या परीक्षांतून होईल. -किरण लोहार, सहसचिव, कोकण विभागीय मंडळ
दहावी, बारावी परीक्षा वेळापत्रक जाहीर
By admin | Published: January 29, 2015 10:17 PM