शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: "चार गोष्टी मनासारख्या होतील, चार विरुद्ध होतील"; फडणवीसांचा इच्छुकांना मेसेज
2
देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्याची पत्रिका व्हायरल; बघा, त्यांच्यासोबत कोण-कोण घेणार शपथ?
3
'त्या' संघर्षातही आमदारांनी साथ सोडली नाही, आज इतिहास घडला - देवेंद्र फडणवीस
4
Devendra Fadnavis : नगरसेवक ते मुख्यमंत्री...अशी आहे देवेंद्र फडणवीस यांची झंझावाती राजकीय कारकीर्द!
5
डिफेन्स स्टॉक्सची मोठी झेप; ₹२१७७२ कोटींच्या अधिग्रहण प्रस्तांवाना मंजुरी; कोणते आहेत शेअर्स?
6
"आता मला लवकर लग्न करायचंय; ३ मुलांना जन्म द्यायचाय, जर दोन वर्षांत मुलगा..."
7
रशिया हल्ला करणार? युरोपमध्ये चाललीय तिसऱ्या विश्वयुद्धाची तयारी; जर्मन गुप्तचर संघटनेच्या दाव्याने खळबळ
8
मार्गशीर्षाचा पहिला गुरुवार: ७ राशींवर धनलक्ष्मी कृपा, लॉटरीतून लाभ; अपार यश, भरभराटीचा काळ!
9
"दिल्लीत येण्याआधी खूप विचार करतो कारण..."; गडकरींची राजधानीपासून दूर राहण्याला पसंती
10
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरला! भाजपा विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड
11
"मी अशा राज्यातून येते, जिथे हिंदी शिकणं गुन्हा वाटतो"; निर्मला सीतारामन लोकसभेत भडकल्या
12
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठं यश; मनी ट्रेल, फंडिंगचे मिळाले पुरावे
13
महिंद्राच्या नवीन इलेक्ट्रिक कारवर बंदी येणार? इंडिगो एअरलाईन्सने खेचलं कोर्टात; काय आहे प्रकरण?
14
IndiGo चा समावेश सर्वात खराब एअरलाईन्सच्या यादीत; 'ही' आहे सर्वात चांगली विमान कंपनी
15
खेडेगावातील लेकीने रचला इतिहास; एकाच वेळी ३ सरकारी नोकऱ्या, आता IAS होण्याचं स्वप्न
16
मोबाइल सायबर हल्ल्यांमध्ये भारत आघाडीवर; २०० हून अधिक अ‍ॅप्स धोकादायक!
17
Pushpa 2 Review: अल्लू अर्जुन नव्हे तर 'या' कलाकाराने गाजवला 'पुष्पा 2'! सिनेमाचा पहिला रिव्ह्यू समोर
18
राहुल गांधींच्या संभल दौऱ्यावरून काँग्रेस-सपामध्ये मतभेद, रामगोपाल यादव म्हणाले...
19
मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावण्यासाठी अभिनेत्याला मिळाले पैसे, म्हणाला- "पांढरे कपडे घालून यायला सांगितलं आणि..."

महात्मा फुले योजनेअंतर्गत आणखी १६५८ पात्र शेतकरी, ४८ हजार शेतकरी कर्जमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 12:05 PM

महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील आणखी १६५८ शेतकरी पात्र झाले आहेत. आतापर्यंत ४३ हजार ३३६ शेतकऱ्यांना २५५ कोटी २२ लाख रुपये कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. जिल्ह्यातील ४८ हजार २४९ शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत.

ठळक मुद्देमहात्मा फुले योजनेअंतर्गत आणखी १६५८ पात्र शेतकरी, ४८ हजार शेतकरी कर्जमुक्तआतापर्यंत ४३ हजार शेतकऱ्यांना २५५ कोटी जमा

कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील आणखी १६५८ शेतकरी पात्र झाले आहेत. आतापर्यंत ४३ हजार ३३६ शेतकऱ्यांना २५५ कोटी २२ लाख रुपये कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. जिल्ह्यातील ४८ हजार २४९ शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत.राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने दोन लाखांपर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणली होती. कोल्हापूर जिल्ह्यातून ५१ हजार ४२६ शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी प्रस्ताव दाखल केले होते. त्यांतील ४६ हजार ५९१ शेतकरी पात्र झाले होते. त्यांपैकी ४५ हजार ५०९ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले. यांतील सर्वाधिक २९ हजार १७२ शेतकरी हे जिल्हा बँकेचे तर १३ हजार १३५ शेतकरी हे व्यापारी बँकांकडील आहेत. या दोन्ही बँकांकडील ४२ हजार ३०७ शेतकऱ्यांना २४९ कोटी ९८ लाख रुपये कर्जमाफीची रक्कम मिळाली होती.मध्यंतरी कोरोनामुळे कर्जमाफी थांबली होती; मात्र खरीप हंगामात शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये, म्हणून महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफीच्या कामास पुन्हा गती दिली. त्यानुसार २१ जुलै रोजी जिल्हा बँकेचे १०२९ शेतकऱ्यांचे पाच कोटी २४ लाख रुपये आले. त्याचबरोबर व्यापारी बँकांचीही यादी आली आहे.

दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील १६५८ पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर आली असून, आतापर्यंत जिल्ह्यातील ४८ हजार २४९ शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत. ज्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले नाही, त्यांनी लॉकडाऊन संपताच त्याची पूर्तता करून घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी पत्रकातून केले आहे.महापुरातील कर्जमाफीचे पैसे ऑगस्टमध्येमध्यंतरी महापुरातील ४१ कोटी रुपये जिल्ह्यासाठी आले होते. त्यातून पावसाने झालेली पडझड व शेतीच्या नुकसानीचे पैसे देण्यात आले. मात्र अद्याप कर्जमाफीपासून काही शेतकरी वंचित आहेत. त्यासाठी पुरवणी यादीतून जिल्ह्यासाठी २५ कोटींची मागणी केली असून साधारणत: १० ऑगस्टपर्यंत हे पैसे उपलब्ध होतील. 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर