कोल्हापूर , दि. ३ : खंडोबाचा गोंधळ घालणाºया ‘वाघ्या’चा अखेर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना मंगळवारी दूपारी दूर्देवी मृत्यू झाला. आनंदा बापू राऊत (वय ५५, रा. राजारामपूरी ३ गल्ली, मातंग वसाहत) असे त्यांचे नाव आहे. केएमटी बस अपघातातील हा तिसरा बळी गेल्याने शहरात पुन्हा तणावाचे वातावरण पसरले. राजारामपूरीमध्ये व्यापाºयांनी बंद पाळून राऊत यांना श्रध्दांजली वाहिली. राजारामपूरीसह शहरात चौका-चौकात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
गंगावेशच्या परिसरात ताबूत विसर्जन मिरवणुकीत भरधाव केएमटी बस घुसल्याने चिरडून तानाजी भाऊ साठे (५०), सुजल भानुदास अवघडे (१५, रा. राजारामपुरी तिसरी गल्ली, मातंग वसाहत, कोल्हापूर) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला; तर अठरा भाविक गंभीर जखमी झाले. आनंदा राऊत यांच्या डोक्याला गंभीर दूखापत झाली होती. सीपीआर रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन त्यांना राजारामपूरीतील खासगी रुग्णालयात दाखल केले होते.
प्रकृत्ती अत्यवस्थ असल्याने गेली तीन दिवस ते मृत्यूशी झुंझ देत होते. मंगळवारी दूपारी दीडच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बस अपघातातील तिसरा बळी गेल्याचे वृत्त शहरात पसरताच तणावाचे वातावरण पसरले. राऊत यांचे नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी रुग्णालयासमोर गर्दी केल्याने गोंधळ उडाला. नातेवाईकांचा अक्रोश, गोंधळामुळे वातावरण धिरगंभीर बनले होते.
राजारामपूरीत व्यापाºयांनी बंद पाळून राऊत यांना श्रध्दांजली वाहिली. घटनेदिवशी संतप्त जमावाने बसची तोडफोड केली होती. राऊत यांच्या मृत्यूचे पडसाद उमटण्याची दाट शक्यता असल्याने शहरात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. राऊत यांच्या मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालयात आनला. तेथून सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात दिला. पंचगंगा स्मशानभूमित शोकाकुल वातावणात त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
राऊत हे खंडोबाचा गोंधळ घालत असत. ते वाघ्या-मुरळीची भूमिका पार पाडत होते. त्यांच्या लोकप्रियतेमुळे त्यांची ‘वाघ्या’ व आनंद महाराज म्हणून ओळख होती. त्यांच्या मृत्यूची माहिती समजताच मातंग वसाहतीमध्ये सन्नाटा पसरला. महिला-पुरुषांना गहिवरुन आले. नातेवाईकांच्या अक्रोशाने परिसर शोकाकुल झाला. पापाची तिकटी येथे रविवारी ( दि. १) ताबूत विसर्जन मिरवणुकीत के.एम.टी. बस घुसून दोघांचा जागीच मृत्यू झाला होता; तर १८ जण जखमी झाले होते. यातील कांही जखमींवर खाजगी रुग्णालयात तर काहींजणांवर सीपीआर रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. या अपघातात गंभीर जखमी झालेले आनंदा बापू राऊत (वय ५०, राजारामपुरी दुसरी गल्ली) यांचा आज (मंगळवार) दुपारी मृत्यू झाला. त्यांच्यावर राजारामपुरी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. हे वृत्त समजताच राजारामपुरीत पुन्हा तणाव निर्माण झाला. सलग दुसºया दिवशीही राजारामपुरी परिसरात बंद पाळण्यात आला.
कालच्या बंदनंतर सकाळपासून पुन्हा व्यवहार सुरळीत झाले होते. मात्र दुपारी सव्वा दोनच्या सुमारास राऊत यांच्या मृत्यूचे वृत्त समजल्यानंतर राजारामपुरी परिसरातील दुकाने उत्स्फुर्तपणे बंद ठेवण्यात आली. मंगळवारी सकाळी सुरु करण्यात आलेली केएमटीची वाहतूकही पुन्हा बंद करण्यात आली आहे.
अपघातात ठार झालेले आणि जखमी झालेले सर्वजण राजारामपुरी (मातंग वसाहत) येथील असल्याने मंगळवारीही राजारामपुरी परिसरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. येथील सर्वच दुकानदारांनी सोमवारी सकाळीही बंद पाळून मृतांना श्रद्धांजली वाहिली.रविवारी (दि. १) रात्री घडलेल्या घटनेचे पडसाद राजारामपुरी येथे मंगळवारीही उमटले. मंगळवारी तिसºया जखमीचाही मृत्यू झाल्याचे समजताच राजारामपुरी मुख्य रस्त्यासह सर्व परिसरातील दुकाने बंद करण्याचे आवाहन संतप्त युवक करत होते, याचा परिणाम म्हणून आज दुपारी राजारामपुरीतील सर्व दुकाने बंद करण्यात आली. त्यामुळे एक प्रकारे कडकडीत ‘बंद’च पाळण्यात आला. कोल्हापूर शहरातील राजारामपुरी ही एक मोठी व्यापारी पेठ मानली जाते; पण ‘बंद’मुळे सर्वत्र शुकशुकाट होता. या परिसरातील मार्गावर सकाळी काही केएमटी बसेस धावल्या, परंतु तिसºया जखमीचा मृत्यू झाल्याचे समजताच केएमटीची वाहतूकही पुन्हा थांबविण्यात आली आहे.