कोल्हापूर म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता गृहित धरून आणखी एक २० बेडचा स्वतंत्र विभाग कार्यान्वित करण्यासाठी सीपीआरने हालचाली सुरू केल्या आहेत.
सध्या सीपीआरमध्ये १० म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठीचा विभाग तयार करण्यात आला आहे. यामध्ये १० रुग्ण दाखल आहेत. त्यांच्यापैकी ३५ वर्षाच्या एका रुग्णावर गुरुवारी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे तर, आणखी दोन रुग्णांवर शुक्रवारी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. म्युकरचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाल्यानंतर लगेचच सीपीआर प्रशासनाने तातडीने पावले उचलत १० बेडचा विभाग सुरू केला. पहिल्या दिवशी पाच आणि दुसऱ्या दिवशी पाच रुग्ण या ठिकाणी दाखल झाले आहेत. या सर्वांच्या बायप्सीचा अहवाल येण्याची वाट पाहिली जात आहे.
पुन्हा रुग्ण वाढल्यास अडचण नको म्हणून आणखी २० बेड वाढविण्यात येणार असून, मानसोपचार विभागात त्यादृष्टीने तयारी सुरू करण्यात आली आहे.