शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

शेतकरीविरोधी, फसवे सरकार उलथवा : अजित पवार, : संपूर्ण राज्यामध्ये असहिष्णुतेचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 11:53 PM

मुरगूड : समतेचा संदेश देणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांच्या भूमीत ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांची हत्या होते. नरेंद्र दाभोलकरांनाही मारले जाते. मात्र, अद्याप यांचे हत्यारे का सापडत नाहीत? कोण आहेत ते?

ठळक मुद्दे मुरगूडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची हल्लाबोल सभा

मुरगूड : समतेचा संदेश देणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांच्या भूमीत ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांची हत्या होते. नरेंद्र दाभोलकरांनाही मारले जाते. मात्र, अद्याप यांचे हत्यारे का सापडत नाहीत? कोण आहेत ते? याबाबत सरकारमधील महत्त्वाच्या व्यक्ती काहीही बोलत नाहीत. पोलीस अधिकाऱ्यांची हत्या होते. भर दिवसा नगरसेवकाला मारले जाते. पोलीसच भक्षक बनून सर्वसामान्यांना मारत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात असहिष्णुतेचे वातावरण निर्माण झाले आहे. समाजा-समाजामध्ये जाती-जातीमध्ये भांडणे लावून आपला फायदा करून घेणाºया फसव्या, शेतकरीविरोधी भाजप सरकारला उलथवून टाका, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले.मुरगूड (ता. कागल) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने उभे केलेल्या हल्लाबोल आंदोलनाच्या पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या सभेत ते बोलत होते.‘मुरगूड’चे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांनी स्वागत केले, तर माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाचा हेतू स्पष्ट करताना भाजप सरकारने विकासाच्याबाबतीत पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय केला असून, जातीयवादी सरकारला पराभूत करून राष्ट्रवादी व काँग्रेसची सत्ता पुन्हा आणण्याची शपथ घेतली.अजित पवार म्हणाले, देशात आणि राज्यात ‘अच्छे दिन’ आणतो म्हणून सत्तेत आलेल्या या भाजप सरकारने काय केले, याचे उत्तर द्यावे. कोणताही प्रश्न उपस्थित केला तर समिती नेमतो, अभ्यास करतो हे मुख्यमंत्री व संबंधित मंत्री यांचे उत्तर ठरलेले आहे. ती सत्तेत वाटा असणारी शिवसेना धड सत्तेत आहे की विरोधात आहे, हेच समजत नाही.धनंजय मुंडे म्हणाले, एक एप्रिल हा नरेंद्र मोदींचा वाढदिवस आहे अशा पोस्ट सोशल मीडियावर आल्या;कारण सत्तेत आल्यापासून मोदींनी जनतेला फसवून कायम एप्रिल फुलच केले आहे. या सरकारमधील जबाबदार मंत्री यांच्या विरोधात बोलू लागले आहेत. ‘अच्छे दिना’चा मंत्र जपणाºया मंत्र्यांना ‘अच्छे दिन’ आले आहेत.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, सरकारविरोधी असणारी चीड आजच्या सभेतून दिसते. दिल्लीत एकटा भाजप सत्तेत येऊ शकत नाही किंवा काँग्रेस सत्तेत येऊ शकत नाही. यासाठी महत्त्वाची असणार आहे ती राष्ट्रवादी, त्यामुळे पवारांचे हात बळकट करण्यासाठी आणि मुश्रीफांना ताकद देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहा.या सभेला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, संग्राम कोते पाटील, आ. जयदेव गायकवाड, आ. शशिकांत शिंदे, प्रकाश गजभिये, रणजितसिंह मोहिते-पाटील, कºहाडचे सारंग पाटील, के. पी. पाटील, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, आर. के. पोवार, निवेदिता माने, भगवानराव साळुंखे, विद्यार्थी सेनेचे नाना पाटील, युवराज पाटील, भैया माने, नविद मुश्रीफ, संगीता खाडे, अनिल साळोखे, रोहित पाटील, विकास पाटील, रणजित सूर्यवंशी, रवी परीट, राहुल वंडकर, आदी प्रमुख उपस्थित होते. तालुका अध्यक्ष शिवानंद माळी यांनी आभार मानले.चंद्रकांदादा, तुम्ही कर्नाटकात जावानिपाणी, बेळगाव परिसर महाराष्ट्रात आला पाहिजे म्हणून शरद पवार, एन. डी. पाटील आजसुद्धा आंदोलने करीत आहेत आणि आमचे महाराष्ट्राचे मंत्री जन्मावे तर कर्नाटकात असे म्हणतात. शिक्षणासाठी महाराष्ट्र, आमदारकीसाठी महाराष्ट्र, मंत्रिपदासाठी महाराष्ट्र, मग कर्नाटकचा पुळका का? चंद्रकांतदादा, तुम्ही कर्नाटकातच जावा, असा टोला अजित पवार यांनी लगावला.‘गायी’ला वाचविणारे, ‘बाई’ला नाचविणारे सरकारआम्हालाही गाय प्रिय आहे, त्याबाबत कायदा केला. आम्हाला वाईट नाही वाटले; पण हजारो कुटुंबांचा विचार करून आम्ही ‘डान्स बार बंदी’चा घेतलेला निर्णय या सरकारने उलथवून पुन्हा ‘डान्स बार’ला परवानगी दिली. गायीला वाचविणारे व पुन्हा बाईला नाचविणारे हे सरकार ‘लोकहितवादी’ आहे का, असा टोला अजित पवार यांनी लगावताच जोरदार टाळ्या पडल्या.खासदारांची गैरहजेरी नजरेतया सभेला ‘राष्ट्रवादी’चे राज्यपातळीवरचे सर्व नेते हजर होते; पण या विभागाचे राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक मात्र या कार्यक्रमास गैरहजर राहिले. त्यांच्या गैरहजेरीची चर्चा मात्र उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये होत होती.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPoliticsराजकारणkolhapurकोल्हापूर