कोल्हापूर : गोकुळ दूध संघ मल्टिस्टेट करण्याचा निर्णय घेऊन सत्ताधाऱ्यांनी कामगार व सभासदांना मूठमाती देण्याचा घाट घातला आहे, असा आरोप ‘गोकुळ बचाव कृती समिती’चे बाबासाहेब देवकर व किरणसिंह पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.
देवकर म्हणाले, ‘गोकुळ’मधील सत्ताधाºयांचा गेल्या तीन वर्षांतील कारभार पाहता हा संघ खासगी मालकीचा करण्याचाच हेतू दिसत आहे. आमच्या विरोधात कोणी बोलायचे नाही, आम्ही करतोय तेच बरोबर आहे, असा कारभार सुरू आहे. जिल्ह्यात ५ हजार ३०० दूध संस्था असूनही यातील ३५०० संस्थांनाच सभासदत्व दिलेले आहे. विरोधकांच्या संस्थेला नोंदणी मिळणार नाही, याची खबरदारी त्यांनी घेतली आहे. मल्टिस्टेटमुळे ‘गोकुळ’ला लागू असलेला राज्य सरकारचा कामगार कल्याण कायदा संपुष्टात येणार आहे. हा निर्णय कामगार व दूध उत्पादक सभासदांच्या हिताला मूठमाती देणारा आहे.
माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शशिकांत खोत, प्रदीप पाटील-भुयेकर यांनीही टीका केली. यावेळी बाबासाहेब चौगुले, किशोर पाटील, एकनाथ पाटील, प्रवीण लाड, नगरसेवक सुभाष बुचडे, मोहन सालपे यांच्यासह संपत दळवी, सुनील पाटील, आदी उपस्थित होते.कोल्हापूरकर धडा शिकवतीलकोल्हापूरची अस्मिता असलेला हा दूध संघ कोण घशात घालत असेल तर कोल्हापूरकर धडा शिकविल्याशिवाय राहत नाहीत.सभेसाठी जागा ठरविण्याचे अधिकार हे संबंधित संघाला आहेत, असे सांगणाºया विभागीय सहनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर यांच्याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा देवकर यांनी दिला.